Sakal Exclusive: वीजपुरवठा गावाचा करू नका खंडित; शेतकऱ्यांच्या रोषामुळे प्रशासनाचे दोन पावले मागे

शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधींना जाब विचारण्यास सुरवात केली.
electrician
electriciansakal
Updated on

Sakal Exclusive : पालखेड धरणातून सोडण्यात आलेल्या आवर्तनामुळे निफाड, दिंडोरी, येवला तालुक्यातील ६५ गावांमधील वीजपुरवठा २१ तास खंडित करण्याच्या जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या आदेशाचे वृत्त ‘सकाळ’मध्ये शुक्रवारी (ता. २२) प्रसिद्ध झाले.

शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधींना जाब विचारण्यास सुरवात केली. त्यामुळे अखेर प्रशासनाने दोन पावले मागे घेत, संपूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ नयेत, असे आदेश जारी केले आहेत. (Orders are issued that electricity supply of entire village should not be interrupted nashik news)

पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी सादर केलेल्या अहवालानुसार पालखेड धरणातून पालखेड डावा कालव्यावरील गावांसाठी शेतीच्या सिंचनासाठी ९९९ दशलक्ष घनफूट आणि पाणीपुरवठा योजनांसाठी एक हजार दशलक्ष घनफूट असे एकूण एक हजार ९९९ दशलक्ष घनफूट आवर्तन १२ डिसेंबरपासून सोडण्यास सुरवात झाली आहे.

२० जानेवारीपर्यंत दिंडोरी, निफाड, येवला तालुक्यातील कालव्यावरील गावांसाठी पाणी सोडण्यात येणार असल्याने या कालावधीत वीजखंडित करण्याचा आदेश देण्यात आला होता. कार्यकारी अभियंत्यांनी पुन्हा ३० डिसेंबरपर्यंत वीजपुरवठा खंडित करण्याचा कालावधी कमी करण्याची विनंती केली आहे.

electrician
Nashik News: जिल्ह्यात चार तालुक्यांना 13 जानेवारीपर्यंत दोन तास वीज

त्यानुसार जिल्हाधिकारी सुधारित आदेश जारी केला आहे. गावाचा वीजपुरवठा खंडित न करता कालव्यावरून अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्या वीजपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा हा सुधारित आदेश आहे.

‘सकाळ’ने शेतकऱ्यांच्या भावना मांडल्याने प्रशासनाला सुधारित आदेश काढावा लागला आहे. त्याबद्दल शेतकऱ्यांतर्फे द्राक्ष बागायतदार संघाचे नाशिक विभागाचे संचालक ॲड. रामनाथ शिंदे, लासलगाव बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोरगुडे आदींनी समाधान व्यक्त केले आहे.

electrician
Nashik News: जिल्हाधिकाऱ्यांचा 21 तास वीज खंडितचा आदेश; शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.