Nashik ZP News: जि. प. लेखा विभागातील पदोन्नत्यांचे आदेश रखडले

Nashik ZP News
Nashik ZP News esakal
Updated on

Nashik ZP News: जिल्हा परिषदेच्या लेखा व वित्त विभागातील सहाय्यक, कनिष्ठ, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक लेखा अधिकारी यांच्या पदोन्नत्या रखडल्या आहेत.

विभागातील ३० कर्मचाऱ्यांना पदोन्नत्या देण्यात आल्या असून, त्यास मंजुरी मिळाली आहे. परंतु, कर्मचाऱ्यांना आदेश मिळत नसल्याने कर्मचारी वर्गात नाराजी पसरली आहे. (orders of promotion in Accounts Department were stopped in zp nashik news)

जिल्हा परिषदेतील लेखा व वित्त विभागातील कनिष्ठ व वरिष्ठ लेखाधिकारी तसेच वरिष्ठ व कनिष्ठ सहाय्य लेखाधिकारी यांच्या रखडलेल्या पदोन्नत्यांना मुहूर्त लागला. सहा महिन्यांपासून ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. मात्र, अंतिम यादी होत नव्हती. अखेर लेखा व वित्त अधिकारी भालचंद्र चव्हाण यांनी पदोन्नती कर्मचाऱ्यांची यादी अंतिम केली.

ही यादी अंतिम झाल्यावर ३० ऑक्टोबरला पदोन्नती समितीची बैठक झाली. या बैठकीचे इतिवृत्तही अंतिम झाले. त्यानंतर पुन्हा २० नोव्हेंबरला पदोन्नती समितीची बैठक पार पडली. या बैठकीचेही इतिवृत्त अंतिम करण्यात आले आहे.

Nashik ZP News
Nashik Water Cut: किमान मागच्या वर्षा इतके पाणी आरक्षण तरी द्या; महापालिका अधिकाऱ्यांची मागणी

बैठक झाल्यावर, साधारण कर्मचाऱ्यांना पदोन्नत्यांचे आदेश मिळणे अपेक्षित होते. परंतु, दिवाळीचे कारण पुढे करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

यातच लेखा व वित्त अधिकारी चव्हाण दोन दिवसांपासून मुंबईत बैठकीसाठी गेलेले असल्याने रजेवर होते. वास्तविक, पदोन्नती बैठक पार पडली असून, इतिवृत्तही मंजूर झालेले आहे. त्यानंतर लागलीच कर्मचाऱ्यांना आदेश देणे आवश्यक आहे. परंतु, आदेश देण्यात कालावधी लागत असल्याने विभागात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. पदोन्नत्यांचे आदेश तत्काळ मिळावेत, अशी मागणी कर्मचारी वर्गाकडून होऊ लागली आहे.

Nashik ZP News
Maharashtra Government Employees Strike: राज्य सरकारी कर्मचारी 14 पासून संपावर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.