Chhagan Bhujbal : शक्तीप्रदर्शनातून भुजबळांचे बेरेजेचे राजकारण; अजित पवारांची येवल्यातील सभा होणार पॉवरफुल

Citizens welcoming Chhagan Bhujbal, who arrived for the first time on Friday after taking oath as a minister, with a thirty-foot garland
Citizens welcoming Chhagan Bhujbal, who arrived for the first time on Friday after taking oath as a minister, with a thirty-foot garland esakal
Updated on

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षप्रमुख शरद पवारांनी पहिली सभा घेतली ती त्यांचे ३२ वर्षांतील विश्वासू सहकारी छगन भुजबळांच्या मतदारसंघात...या सभेला झालेल्या विक्रमी गर्दीमुळे बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी भुजबळदेखील पुढे सरसावले आहेत.

शुक्रवारी (ता.१४) येथे शक्तीप्रदर्शनातून मतदारसंघावरील आपली पकड भुजबळांनी दाखवून दिली. नाराजांची समजूत घालण्यासाठी २३ तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेचे आयोजन करून पकड अधिक घट्ट करण्याचे बेरजेचे राजकारण भुजबळ करत आहेत. (organizing Deputy CM Ajit Pawar meeting Bhujbal is doing sum politics nashik news)

उपमुख्यमंत्री पवार यांच्या सभेसाठी गर्दीने उत्तर देण्याचे नियोजन सुरू आहे. शुक्रवारी भुजबळांच्या स्वागतातून याची झलक पाहायला मिळाली. भुजबळ समर्थक दिलीप खैरे व सहकाऱ्यांच्या अथक नियोजनातून संपूर्ण सोहळा देखणा झाला.

येवल्यात आगमन होताच ११ जेसीबीतून झालेली पुष्पवृष्टी, सात क्रेनमधून तब्बल २०० किलो वजनाचे घातलेले सात पुष्पहार, फटाक्यांची आतषबाजी, डिजेच्या निनादात निघालेली मिरवणूक, अंगणगाव ते शहरापर्यंत चौफेर लागलेले स्वागताचे बॅनर, पारंपरिक वाद्य, आदिवासी नृत्य...हे दृश्य भुजबळांच्या येथील लोकप्रियतेची झलक सांगण्यासाठी पुरेसे होते.

अंगणगाव परिसरातील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास, नाट्यगृह येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास, शिवसृष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व विंचूर चौफुली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत त्यांनी पुरोगामी विचारांचा वारसा जपत अभिवादन केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Citizens welcoming Chhagan Bhujbal, who arrived for the first time on Friday after taking oath as a minister, with a thirty-foot garland
Ajit Pawar PM Meet: राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवारांची दुसऱ्यांदा दिल्ली वारी, पहिल्यांदाच घेणार PM मोदींची भेट

स्वागताच्या मिरवणुकीने येवलेकरांचे लक्ष वेधले. ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, जयदत्त होळकर यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. आपल्या होमपिचवर झालेल्या अनोख्या स्वागतामुळे भुजबळांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

किंबहुना भाषणातूनही हा आनंद व्यक्त झाला. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना, त्यासाठीचे योगदान इथपासून ते २००४ मध्ये येवल्याची उमेदवारी आणि त्यानंतर झालेली विकासकामे...हा संपूर्ण सारीपाट त्यांनी पुन्हा उपस्थितांपुढे मांडताना येवलेकरांचे असलेले प्रेम व्यक्त केले. विकासाला गती मिळत असेल तर अशा चुका राज्यभर करा हे उद्गगार बोलके होते.

सभेत एक कार्यकर्ता काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करताच, मी येथेच आहे.. कुठे जाणार नाही आणि कोणी मला घालवू शकत नाही...या त्यांच्या वाक्यावर एकच टाळ्या पडल्या..! मिळालेले मंत्रिपद मतदारसंघाच्या विकासासाठी उपयोगात येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये सभेच्या निमित्ताने चैतन्य निर्माण करण्यात यश आले आहे, हे नक्की!

Citizens welcoming Chhagan Bhujbal, who arrived for the first time on Friday after taking oath as a minister, with a thirty-foot garland
Chhagan Bhujbal Latest Update : भुजबळांच्या बैठकीला शरीराने हजर असणाऱ्यांची मनेही तपासणार

खैरेंच्या नियोजनाने सोहळा देखणा!

राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी स्वागत सोहळ्याच्या नियोजनासाठी तीन दिवस मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत समता परिषद, भुजबळ समर्थक व राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सोबतीने सर्वांगीण नियोजन केले होते. यामुळे नियोजनातील एकसूत्रीपणा आणि स्वयंशिस्त हे वैशिष्ट्य दिसले.

जेसीबी, क्रेन, पुष्पहार, फुलांची सजावट असा आगळावेगळा स्वागत सोहळा येथे झाला. विशेष म्हणजे यापूर्वी अनेकदा भुजबळ मंत्री झाले परंतु त्या तुलनेत आजचा सोहळा वेगळाच होता. दिलीप खैरे व त्यांच्या टीमने केलेल्या नियोजनाने सोहळ्यात रंगत भरली. यामुळे भुजबळ यांनीही या नियोजनाचे कौतुक केले.

Citizens welcoming Chhagan Bhujbal, who arrived for the first time on Friday after taking oath as a minister, with a thirty-foot garland
Chhagan Bhujbal: बैठकी सतत होत असतात; पण मला मतदारांना भेटणे प्राधान्याचे : छगन भुजबळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()