राज्यात अनाथांना मिळणार पिवळी शिधापत्रिका - छगन भुजबळ

yellow ration card
yellow ration cardesakal
Updated on

नाशिक : राज्यातील अनाथांना स्वतंत्र शिधापत्रिका मिळावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. याबाबत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी बैठका घेत अनाथांना वयाच्या २८ वर्षांपर्यंत तात्पुरती पिवळी (बीपीएल) शिधापत्रिका वितरण करण्याबाबतचा निर्णय प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत घेतला आहे. (Orphans-will-get-yellow-ration-card-said-chhagan-bhujbal-nashik-marathi-news)

छगन भुजबळ - वयाच्या २८ वर्षांपर्यंत लाभ

भुजबळ म्हणाले, की राज्यातील २८ वर्षांपर्यंतच्या अनाथांना बीपीएल शिधापत्रिकेबरोबर त्याचे लाभ मिळतील. वयाच्या २८ वर्षांवरील अनाथांना उत्पन्नाप्रमाणे शिधापत्रिका मिळेल. त्याप्रमाणे त्याचे लाभ देण्यात येतील. कोरोनाकाळात अनेक मुलांच्या पालकांचे मृत्यू झाल्यामुळे ते अनाथ झाले आहेत. अशा मुलांना या निर्णयाचा मोठा फायदा होईल. राज्य सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर शिधापत्रिका मिळविताना कागदपत्रांचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी अनाथ असल्याचा पुरावा म्हणून महिला व बालविकास विभागाने वितरित केलेले अनाथ प्रमाणपत्र अथवा आई-वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येईल. अनाथांना दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यांना सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे.

yellow ration card
काळ्या बाहुलीची जादू अन्‌ पैशांचा पाऊस! नाशिकमधील प्रकार
yellow ration card
नाशिकच्या भाजप नगरसेवकांच्या मुंबई वारीने खळबळ!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.