Nashik News: अन्यथा युरियाची विक्री बंद; ‘कृषी’कडून कार्यवाहीची मागणी

बदनामी अन्‌ नुकसान टाळण्यासाठी कृषी निविष्ठा विक्रेते आग्रही
Uria
UriaSakal
Updated on

Nashik News : खते ‘लिंकिंग’मधून होणारी बदनामी आणि नुकसान टाळण्यासाठी कृषी निविष्ठा विक्रेत्यांना कृषी विभागाकडून कार्यवाहीची अपेक्षा आहे. त्यात तोडगा न निघाल्यास युरियाची विक्री बंद करण्याच्या निर्णयाप्रत विक्रेते पोचले आहेत.

नाशिक ॲग्रो डीलर्स असोसिएशनच्या कार्यालयात युरिया आणि खते ‘लिंकिंग’सह यंदाच्या हंगामातील शिल्लक बियाण्यांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक झाली. संघटनेचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, विक्रेते उपस्थित होते. त्यात हा सूर उमटला. (Otherwise sale of urea stopped Demand for action from Krishi department Nashik News)

रासायनिक खत कंपन्या त्यांच्या सर्व रासायनिक खतांना युरिया ‘लिंक’ करून देतात. त्याचे प्रमाण एकास एक म्हणजे एक गोणी युरियासोबत इतर गोणी इतर खताची दिली जाते. इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, सुरगाणा, पेठ तालुक्यांत भात शेती अधिक असल्याने शेतकऱ्यांची युरियाची मागणी असते.

युरिया सोबत रासायनिक खत विकल्यास कृषी निविष्ठा विक्रेता शेतकऱ्यांच्या नजरेत दोषी ठरतो. खत उत्पादक कंपनीला दोष दिला जात नाही. युरिया खताच्या ‘लिंकिंग’चा प्रश्‍न दरवर्षी येतो.

काही कंपन्या मिश्र खते, तर काही कंपन्या विद्राव्य खते ‘लिंकिंग’ करतात. गाडीभर युरियाची किंमत ५३ हजार रुपये होते. ‘लिंकिंग’मुळे तीन ते पाच लाख रुपये खरेदी करावे लागते. त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा, ही भावना कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी मांडली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Uria
Nashik Bogus Seed Sale: बोगस बियाण्यांमुळे 15 शेतकऱ्यांना फटका! कंपन्यांवर कारवाई करणार कधी?

गुंतणारे भांडवल निराळे

युरिया कंपनी खरेदी, वाहतूक, हमाली असा खरेदी खर्च काढल्यास युरियाची खरेदी ‘एमआरपी’च्या वर जाते. शेतकरी युरिया खरेदी करतात. त्यामुळे ‘लिंकिंग’चे इतर खते, विद्राव्य खते, निविष्ठा विक्रेत्यांच्या दुकानात शिल्लक राहतात.

त्यातून विक्रेत्यांचे भांडवल अडकते. त्यामुळे आता कृषी निविष्ठा विक्रेत्यांना कृषी विभागाकडून न्याय मिळावा, अशी हाक बैठकीत देण्यात आली.

असोसिएशनचे संस्थापक विजयनाना पाटील, उपाध्यक्ष अरुण मुळाणे, लक्ष्मीकांत जगताप, मंगेश तांबट, चंद्रकांत ठक्कर, सुनील पाटील, कृष्णा पगार, रामचंद्र आहेर, पोपटराव धनवटे, काकासाहेब भालेराव, बाळासाहेब जाधव, रामभाऊ जाधव, संजय हिरावत, महेंद्र बोरा, विनोद खिंवसरा, संतोष पाटील, नितीन काबरा आदी उपस्थित होते.

Uria
Modi Awas Gharkul Yojana: राज्यात इतर मागास प्रवर्गास मोदी आवास घरकुल योजना! 10 लाख घरांसाठी 12 हजार कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.