जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आलेख वाढत चालला आहे. गेल्या दोन महिन्यांत ग्रामीण भागातून कोरोना बळींची संख्या अधिक असतांना आता पुन्हा एकदा कोराना मृत्यूबाबत नाशिक शहर केंद्रस्थानी आले आहे
नाशिक : जिल्ह्यात कोरोनामुळे (Coronavirus) होणाऱ्या मृत्यूचा आलेख वाढत चालला आहे. गेल्या दोन महिन्यांत ग्रामीण भागातून कोरोना बळींची Corona Deaths) संख्या अधिक असतांना आता पुन्हा एकदा कोराना मृत्यूबाबत नाशिक शहर केंद्रस्थानी आले आहे. गुरुवारी (ता.२७) जिल्ह्यात झालेल्या ३६ मृत्यूंपैकी शहरातील वीस मृतांचा समावेश आहे. उर्वरित सोळा नाशिक ग्रामीण भागातील आहेत. (out of 36 corona deaths in the district 20 deaths are in Nashik city)
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतांना पहिल्या टप्यात शहरात कोरोना बळींची संख्या अधिक होती. दुसऱ्या लाटेत मात्र ग्रामीण भागाला मोठा फटका बसला. परंतु गेल्या काही दिवसांत पुन्हा एकदा नाशिक शहरात मृतांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे.
दरम्यान, गुरुवारी झालेल्या मृतांमध्ये नाशिकरोड, पंचवटी, इंदिरानगर, राजीवनगर, अंबड, इंदिरानगर, काठे गल्ली येथील मृतांचा समावेश आहे. नाशिक महापालिका क्षेत्रातील वीस बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद असली तरी या क्षेत्राला लागून असलेल्या पळसे, देवळाली कॅम्प आणि भगूर येथील प्रत्येकी एक असे तीन मृत नाशिक तालुक्यातील आहेत. ग्रामीणमधील मृतांमध्ये निफाड तालुक्यातील पाच, मालेगाव ग्रामीण व सिन्नर तालुक्यातील प्रत्येकी तीन, इगतपुरी व चांदवड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
सायंकाळी उशीरापर्यंत दोन हजार ८६२ रुग्णांना अहवालाची प्रतिक्षा कायम होती. यापैकी एक हजार ३०७ नाशिक ग्रामीणमधील तर एक हजार १८८ नाशिक शहर, मालेगाव ग्रामीणच्या ३६७ रुग्णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्हाभरातील रुग्णालये व गृहविलगीकरणात एक हजार २८२ रुग्ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील एक हजार १४० रुग्णांचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयात पाच, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात आठ रुग्ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमध्ये ९७ तर मालेगाव महापालिका क्षेत्रात ३२ रुग्ण दाखल झाले.
७२८ पॉझिटिव्ह, एक हजार ११७ कोरोनामुक्त
गुरुवारी नाशिक महापालिका क्षेत्रातील ३२५, नाशिक ग्रामीणमधील ३९७ तर मालेगावच्या सहा अशा एकूण ७२८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. नाशिक शहरातील २३९, नाशिक ग्रामीणमधील ८७६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली. मालेगावचे दोघे रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातून ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत ४२५ ने घट झाली आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात १३ हजार ९७२ बाधितांवर उपचार सुरु आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.