Nashik News: ‘महिंद्र अँड महिंद्र’मध्ये 700 कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकीचे विस्तारीकरण सुरू

Mahindra company
Mahindra companyesakal
Updated on

सातपूर : महिंद्र अॅण्ड महिंद्र प्रकल्पात सहा महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात नवीन टेक्नोलॉजीचा वापर करून उत्पादन दुप्पट करण्यासाठी सुमारे ७०० कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक करीत विस्तारीकरणाचे काम सुरू आहे.

या नवीन प्रकल्पाच्या आराखड्यास उद्योग विभागाकडून मंजुरी घेण्यात आली आहे. त्याचबरोबर नवीन आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, या गुंतवणुकीत अजून शेकडो कोटींची वाढ होणार असल्याचे संकेत उद्योग विभागातील मंत्रालय स्तरावरील अधिकारी तसेच ‘महिंद्र’चे कॉर्पोरेटचे अधिकारी यांनी आपले नाव न सांगण्याच्या अटीवर ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. (Over 700 crore investment in Mahindra & Mahindra to expand Nashik News)

काळाची गरज ओळखून ‘महिंद्र अॅण्ड महिंद्र’चे सर्वेसर्वा आनंद महिंद्र व पवन गोयंका यांनी नाशिक व पुणे प्रकल्पात हजारो कोटींची गुंतवणूक करण्याचे संकेत दिले होते. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ‘एमएयू’ झाल्याचेही जाहीर केले होते.

यात नाशिकपेक्षा पुण्यालाच मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्याने नाशिकवर अन्याय झाल्याच्या बातम्या माध्यमातून आल्या होत्या. या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिकच्या प्रकल्पातही ही गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे ‘सकाळ’शी बोलताना सांगितले होते.

दरम्यान, तीन महिन्यांपासून ‘महिंद्र अॅण्ड महिंद्र’च्या नाशिक प्रकल्पात मोठ्या प्रमाणात विस्तारीकरणाचे काम सुरू आहे.

यात प्रामुख्याने नवीन पेंट शॉप, नवीन कन्व्हर लाइन, आरएनडी डिपार्टमेंट शिफ्टिंग करीत विविध नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून अद्ययावत इमारत साकारण्यात येत आहे. यामुळे नाशिक प्रकल्पाच्या क्षमतेत दुपटीने वाढ होणार असल्याचे संकेत ‘महिंद्र’च्या वरिष्ठ व्यवस्थापकांनी ‘सकाळ’शी बोलताना दिले.

Mahindra company
Maha Shiv Puran Katha: देवाच्या नामस्मरणासाठी वेळ काढ : पंडित प्रदीप मिश्रा

काका-पुतण्या

सध्या महाराष्ट्रातील राजकारणात शरद पवार- अजित पवार, बाळासाहेब ठाकरे- राज ठाकरे, गोपीनाथ मुंडे- धनंजय मुंडे असे काका-पुतण्यांबाबत चर्चा ऐकतो. पण, केशूबभाई महिंद्र यांना फक्त मुलीच होत्या.

त्यांच्यानंतर महिंद्र ग्रुपचा कारभार हा मुली किंवा जावयावर सोपवू शकत होते. पण, काळाची गरज ओळखून त्यांनी ही धुरा पुतण्या आनंद महिंद्र यांच्याकडे दिली.

जगात ऑटोमोबाईल नाही, तर ट्रॅक्टर, कृषी, फळ उत्पादन, लॉजिस्टीक, आयटीसह विविध क्षेत्रांत ‘महिंद्र अॅन्ड महिंद्र’ने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आजी- माजी पदाधिकाऱ्यांचे लक्ष

नाशिक प्रकल्पात पवन गोयंका. नाशिकचे भूमिपुत्र हिरामण आहेर, विजय कार्ला, धनंजय जोशी, इगतपुरी प्रकल्पाचे नाशीर देशमुख, हेमंत शिक्का, कर्नल वैद्य व कर्नल बॅनर्जी या आजी- माजी पदाधिकाऱ्यांच्या काळात नाशिक प्रकल्पात विविध गुंतवणूक झाली होती.

पण, तत्कालीन उपाध्यक्ष हिरामण आहेर व सध्याचे उपाध्यक्ष गणेश शेणॉय यांच्या काळात सर्वांत मोठी नाशिक प्रकल्पात गुंतवणूक झाल्याने उत्पादनात दुपटीने वाढ करण्याचे ‘लक्ष्य’ साध्य झाले आहे.

मागणीनुसार परवानगी

गेल्या काही महिन्यांपासून ‘महिंद्र अॅन्ड महिंद्र’च्या नाशिक प्रकल्पात सुमारे पाच लाख मीटरपेक्षा जास्त अतिरिक्त बांधकामाला परवानगी एमआयडीसी विभागामार्फत देण्यात आली आहे. जसजशी त्यांची डिमांड असेल, तसतशी नियमानुसार परवानगी दिली जाईल.

Mahindra company
Nashik News: शिवपुराण कथावाचक पंडित प्रदिप मिश्रा यांनी केला श्री कपालेश्वर महादेवास जलाभिषेक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.