नाशिक : जनतेच्या सहकार्याने कोरोनावर मात

पालकमंत्री भुजबळ : प्रजासत्ताक दिनाचा मुख्य ध्वजवंदन कार्यक्रम उत्साहात
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbalsakal
Updated on

नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट कायम असले तरी जनतेच्या सहकार्याने कोरोनावर आपण मात करू शकतो. त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या विकासाला अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

Chhagan Bhujbal
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेलांनी मानले PM मोदींचे आभार

पोलिस कवायत मैदानावर आयोजित भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य ध्वजवंदन समारंभप्रसंगी जनतेला शुभेच्छा देतांना पालकमंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर, पोलिस आयुक्त दीपक पांडे, महाराष्ट्र पोलिस अकादमीचे संचालक, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Chhagan Bhujbal
लैंगिक छळाच्या खोट्या तक्रारी संतापजनक; दिल्ली उच्च न्यायालयाची नाराजी

पालकमंत्री भुजबळ म्हणाले, की राज्यातील गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात दोन वेळचे अन्न उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन थाळी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात ९० शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. ही योजना सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत जिल्ह्यातील ४९ लाख ५७ हजार ४३५ गरीब व गरजू लाभार्थ्यांना शिवभोजन थाळीचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील कोविडमुळे निधन पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना ३६ कोटी ४२ लाखांचे सानुग्रह अनुदान मंजुर करण्यात आले असून कोविडच्या काळात ० ते १८ वयोगटातील दोन्ही पालक गमावलेल्या २३ बालकांना प्रत्येकी पाच लाख सानुग्रह अनुदान मुदत ठेविच्या स्वरूपात देण्यात आले आहे. तसेच या बालकांना ‘बाल संगोपन’ योजनेंतर्गत प्रति महिना ११०० रुपये एवढा लाभ देण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. या बालकांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून आत्तापर्यंत तीन लाख १३ हजार ५९ रूपये फी संबंधीत शाळांना अदा करण्यात आली आहे. ध्वजवंदन कार्यक्रमानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.