पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : वातावरणात ऑक्सिजनचे (Oxygen) फेरभरण होण्यासाठी तातडीचे आणि दीर्घकालीन उपाय करण्याची गरज आहे. गरज पूर्ण करण्यासाठी व धार्मिक महत्त्व आणि औषधी गुणधर्मांनी युक्त तुळस (tulsi) आणि चोवीस तास ऑक्सिजन देणारा पिंपळ, वड (baniyan tree), कडुनिंब यांसारखे वृक्ष (tress) ऑक्सिजनची गरज भागवू शकतील. त्यामुळे परदेशी झाडांच्या प्रेमात न पडता आपल्या भौगोलिक वातावरणात मुबलक प्राणवायू देणाऱ्या झाडांचे संगोपन, संवर्धन करण्याची वेळ कोरोनाने आणली आहे. याबाबत तज्ज्ञांनीही (experts advice) नागरिकांना आवाहन केले आहे.
काय सांगतात तज्ज्ञ..
कोरोनाच्या विद्यमान परिस्थितीत धावाधाव करावी लागत आहे, तशी वेळ भविष्यात येऊ नये यासाठी आताच पावले उचलण्याची गरज आहे, असे मत पिंपळगावच्या क. का. वाघ महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्राचे प्रा. अभिजित पवार यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, की तुळस ही हवेचे शुद्धीकरण करणारी ऑक्सिजन देणारी वनस्पती आहे. याशिवाय तुळशीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे किमान प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरापुढे किमान सात-आठ तुळशीची रोपे लावली पाहिजेत. यामुळे घरामध्ये शुद्ध हवा राहील. परिसरात पिंपळ, वड, कडुनिंब, चिंच, आंबा अशी मोठ्या पानांची आणि आपल्या भौगोलिक वातावरणात वाढणारी झाडे लावण्याशिवाय पर्याय नाही.
ऑक्सिजन देणारी रोपे भेट द्या
प्रा. पवार यांनी सांगितले, की एका अहवालानुसार सहा इंचांच्या कुंडीत १४ ते १५ मोठी, तर ३० ते ३६ लहान वनस्पती लावल्या, तर एक हजार ८०० चौरस फूट जागेतील हवा शुद्ध ठेवण्यासाठी उपयोग होऊ शकतो. जापनीज रॉयल फेर्न ही वनस्पती केवळ ऑक्सिजन देत नाही, तर त्याबरोबरच वातावरणातील फॉर्मलडिबाईड नावाचा विषारी वायुदेखील शोषून घेत असते. केमिकल कंपन्या, एमआयडीसीतून मोठ्या प्रमाणात हा वायू निघत असतो. त्यामुळे अशा भागात या वनस्पतीची लागवड केली पाहिजे. बोस्टन फर्न, जर्बेरा ही झाडे ऑक्सिजनसाठी पूरक आहेत. कोणत्याही कार्यक्रमात आता रोपे भेट देण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू झाला आहे. ऑक्सिजन देणारी रोपे दिली, तर दुधात साखर पडेल.
मोठ्या पानांची आपल्या भौगोलिक वातावरणात वाढणारे पिंपळ, वड, कडुनिंब, चिंच ही झाडे कमी झाली आहेत. ही झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड हा दूषित वायू शोषून घेऊन ऑक्सिजनचे फेरभरण करतो. फूल व शोभेच्या झाडांचा मोह टाळून ऑक्सिजन पुरविणाऱ्या झाडांची लागवड व संगोपन होण्याची गरज आहे. -प्रा. अभिजित पवार, विभागप्रमुख, वनस्पतिशास्त्र, क. का. वाघ महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत
पूर्वीच्या लोकांनी दूरदृष्टी ठेवून पिंपळ, वड आदींची लागवड केली. पण, त्याची आज कत्तल झाली आहे. कोरोनाच्या संकटात या झाडांचे महत्त्व अधोरेखित होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून ऋणस्मृती फाउंडेशनच्या माध्यमातून पिंपळ, वड, कडुनिंब, चिंच, आंबा या झाडांचे पिंपळगाव शहरात वृक्षारोपण केले आहे. -सुधाकर कापडी, उपाध्यक्ष, ऋणस्मृती फाउंडेशन, पिंपळगाव बसवंत
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.