ओझर (जि. नाशिक) : येथील अकबरी मशिदीजवळील मदरसा फातमाच्या मागील बाजूस असलेल्या एका पत्र्याच्या शेडमधील कत्तलखान्यावर ओझर पोलिसांनी छापा टाकून गोवंश जनावरांचे मांससह सात लाख ६८ हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी पळ काढला. (Ozar police raided slaughterhouse and seized cattle meat worth Rs 7 lakh from Near masjid nashik crime news)
या छाप्यात पोलिसांनी जवळपास १,५०० किलो गोवंश जनावरांचे मांस, कत्तल केलेले अवयव व दहा मोटारसायकलींसह कत्तलीसाठी लागणारे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला. ओझरमधील चांदणी चौकातील संबंधित ठिकाणी जाऊद्दीन कुरेशी यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशाची क्रूरपणे कत्तल करून गोवंश मांस विक्रीसाठी उपलब्ध केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी, उपनिरीक्षक अर्चना तोडमल व त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी अचानक छापा टाकला. त्या वेळी आठ गोवंश जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस, कातडी, कत्तलीचे साहित्य व हाडे, शिंगे, क्यूआर कोडचे स्टॅन्ड, वजनकाटा आदी साहित्य मिळून आले.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
पोलिसांनी हे साहित्य जप्त करून जुबेर लतीफ कुरेशी, ईजाज इसाक कुरेशी, ईस्तीयाक इसाक कुरेशी, अन्वर सुलतान कुरेशी, सलीम सुलतान कुरेशी, नदीम फारुख कुरेशी, अल्तमस सलीम कुरेशी, शाहरुख सलीम कुरेशी व जाऊद्दीन सुलतान कुरेशी (सर्व रा. चांदणी चौक, ओझर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पोलिस आल्याची चाहूल लागताच हे सर्वजण संपूर्ण साहित्यासह मुद्देमाल जागेवर सोडून पळून गेले. पोलिस उपनिरीक्षक श्रीमती तोडमल तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.