Business Training : प्लास्टिक, कोरूगेटेड किंवा अन्य पॅकेजिंग तंत्रज्ञान व त्यासाठी लागणारे मटेरिअल कसे बनवितात, यात व्यवसाय करायला कोणत्या संधी उपलब्ध आहेत,
या बाबत परिपूर्ण मार्गदर्शन करणारे एक दिवसीय खास प्रशिक्षण शनिवारी (ता.१५) सकाळ- ॲग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था एसआयआयएलसी तर्फे नाशिक सातपूर सकाळ कार्यालयात आयोजिले आहे. (packaging business Know special Business Training for new entrepreneurs at nashik on saturday news)
पॅकिंग केलेल्या प्रॉडक्ट्सची ग्राहकांकडून वाढती डिमांड असल्याने पॅकेजिंग मटेरिलच्या वापरात २०० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अनेकांना माहिती नाही. परंतु व्यवसाय करण्यासाठी या क्षेत्रात खूप संधी आहेत.
प्रत्येक ग्राहक प्रॉडक्ट खरेदी करताना त्याचे पॅकिंग कसे आहे हे आवर्जून बघतो. मात्र पॅकिंगमधील बहुतांश भाग हा मटेरिअलवर अवलंबून असतो व प्रॉडक्टनिहाय पॅकींगच्या मटेरिअलमध्येही बदल करावा लागतो.
असे हे विविध प्रकारचे पॅकिंग मटेरिअल कसे बनवितात, त्यासाठी कोणत्या मशिनरी लागतात, छोटे पॅकेजिंग युनिट सुरू करण्यासाठी अंदाजे किती गुंतवणूक करावी लागते इ.विषयी मुंबईस्थित पॅकेजिंग क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ व ॲग्रोवनचे लेखक शैलेश जयवंत हे या प्रशिक्षणाला मार्गदर्शन करणार आहेत.
ज्यांना पॅकेजिंगमध्ये स्टार्टअप करायचे आहे तसेच पॅकेजिंग युनिट असून त्यांना यातील अद्ययावत तंत्रज्ञान जाणून घ्यावयाचे आहे इ. साठी प्रशिक्षण फायदेशीर आहे. प्रशिक्षणात प्रत्यक्ष पॅकेजिंग मशिनरी बघण्याची संधी असणार आहे. प्रति व्यक्ती १५०० रुपये शुल्क आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : ९२८४७ ७४३६३
प्रशिक्षणातील विषयः
- पॅकेजिंगचे विविध प्रकार
- इंडस्ट्रीनिहाय पॅकेजिंग
- पॅकिंग मटेरिअल बनविण्याची पद्धती
- आवश्यक यंत्रसामग्री
प्रशिक्षण वार व दिनांक : शनिवार, ता.१५ एप्रिल २०२३
ठिकाण : सकाळ कार्यालय, सातपूर एमआयडीसी, त्र्यंबक रोड, नाशिक
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ५
शुल्क : प्रति व्यक्ती दीड हजार रुपये
नावनोंदणीसाठी संपर्कः ९२८४७ ७४३६३
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
जळगावच्या उमेशचे स्वप्न ‘सनस्टोन’च्या साहाय्याने पूर्ण
मुंबई, ता. भारतातील ३५ शहरांमधील ५० पेक्षा जास्त संस्थांमध्ये उपस्थित असलेले एक अग्रगण्य उच्च शिक्षण स्टार्ट अप सनस्टोनने जळगावमधील एक विद्यार्थ्याला एमबीए पूर्ण करून नामांकित कंपनीमध्ये स्थान मिळवण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली आहे.
इंदूरच्या एसएजीई विद्यापीठाचा (एसएजीई युनिव्हर्सिटी) विद्यार्थी उमेश भागीरथ पाटील याने फिटजी या जेईई व इतर स्पर्धा परीक्षांसाठी संपूर्ण भारतात उपस्थित असलेल्या प्रशिक्षण संस्थेत स्थान मिळवले आहे. २०२१ मध्ये उमेशने फायनॅन्स आणि मार्केटिंगमधील मुख्य स्पेशलायझेशनसह एमबीए प्रोग्रामसाठी स्वतःची नोंदणी केली.
सनस्टोनमधील त्याच्या अनुभवाविषयी बोलताना उमेश पाटील याने सांगितले, ‘सनस्टोन’चे प्रशिक्षण आणि तेथे मिळालेले ज्ञान यामुळे मला एका प्रतिष्ठित संस्थेसाठी काम करण्याची माझी इच्छा पूर्ण करण्यास मदत झाली आहे.
सनस्टोन मधून माझी पदवी पूर्ण केल्याने मला अमूल्य अशी संसाधने, स्त्रोत आणि कौशल्ये (सॉफ्ट स्किल्स) मिळाले ज्यामुळे माझ्या बायोडेटाला आणि भविष्यातील करियरच्या शक्यतांना बळकटी मिळाली.
जळगावात रिलायन्स रिटेलचे ट्रेड्स
मुंबई : रिलायन्स रिटेलची भारतातील सर्वांत मोठी आणि सर्वांत वेगाने वाढणारी कपड्यांची, अॅक्सेसरीजची आणि आणि फूटवेअरची स्पेशालिटी चेन, ट्रेंड्सने महाराष्ट्र राज्यातील जळगाव शहरात आपल्या नवीन स्टोअरच्या प्रारंभाची घोषणा केली आहे.
नवीन स्टोअर नयनतारा आर्केड, जळगाव येथे २५ जानेवारी रोजी सुरू झाले. भारतातील मेट्रो, मिनी मेट्रोपासून टियर १, २ शहरे आणि त्या पलीकडच्या छोट्या शहरांमधील ग्राहकांपर्यंत आपली पोहोच आणि कनेक्ट वाढवून ट्रेंड्स खरोखर भारतातील फॅशनचे लोकशाहीकरण करत आहेत.
अॅम्बीयन्स मॉल, गुरगाव येथे २००७ मध्ये आपले पहिले स्टोअर सुरू करून फॅशनचे लोकशाहीकरण करण्याच्या प्रवासाला ट्रेंड्सने सुरवात केली. ट्रेंड्स हे भारताचे फॅशनच्या खरेदीचे आवडते ठिकाण बनले आहे. दररोज सरासरी साडेतीन लाख ग्राहक येथे भेट देत असतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.