पावसाअभावी भात आवणी खोळंबली; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

paddy farming
paddy farmingesakal
Updated on

पळसन (जि. नाशिक) : पावसाने दडी मारल्याने परिसरात भात आवणी खोळंबली आहे. मागील पंधरवड्यात समाधानकारक पाऊस झाला होता. त्यामुळे भात उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. मात्र, पाच ते सहा दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने भाताची तयार झालेले कोवळी रोपे वाया जाण्याची भीती आहे. तालुक्यात १८ हजारपैकी १३ हजार हेक्टर क्षेत्र भात आवणीसाठी आहे. त्यापैकी केवळ दोन हजार हेक्टरवरच भात आवणी झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. (paddy-cultivation-stopped-in-nashik-district-due-to-lack-of-rains-nashik-agriculture-news)

कोरडवाहू शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे

सुरवातीला पेरणी झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवस पावसाने दडी मारली होती. त्यामुळे भात बियाण्याची उगवणक्षमता घटली होती. काहींना दुबार पेरणी करावी लागली होती. तालुक्यात कोरडवाहू शेतकरी हा खरीप हंगामात पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतो. पुरेसा पाऊस पडला नाही, तर खरीप हंगाम वाया जाऊ शकतो. तालुक्यात सर्व पिकांचे मिळून एकूण लागवड क्षेत्र १८ हजार हेक्टर असून, १३ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्यांपैकी साधारण दोन हजार हेक्टरवर जेमतेम भातलागवड करण्यात आली आहे.
कोरडवाहू शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.

पीक प्रकार लागवडीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)
भात - १३,१००
नागली - ८,५००
खुरासणी - ३,५००
उडीद - १,५००

paddy farming
नाशिक महापालिकेच्या उत्पन्नात पडणार भर!

''सुरगाणा तालुक्यात सिंचन क्षेत्र अत्यल्प असून, शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाणीपुरवठ्याची सोय आहे त्यांनी सकाळी किंवा सायंकाळी भाताच्या वनात पाणी भरावे. उन्हात पाणी भरल्याने भाताची कोवळी रोपे कोमेजून जातात. पुरेसा पाऊस नसेल तर थोडे दिवस थांबून लागवड करावी. पुरेशी वाढ न झालेली कोवळी रोपे लावू नयेत. कोवळी रोपे रोगाला बळी पडतात.'' -प्रशांत रहाणे, तालुका कृषी अधिकारी, सुरगाणा

(paddy-cultivation-stopped-in-nashik-district-due-to-lack-of-rains-nashik-agriculture-news)

paddy farming
सावधान! नाशिक शहरात डेंग्यू, चिकनगुनिया रुग्णांमध्ये वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.