चित्रकाराचे अनोखे शिवप्रेम, स्वत:च्या रक्ताने रेखाटले छत्रपती!

painter has drawn a picture of Chhatrapati Shivaji Maharaj using his own blood in nashik
painter has drawn a picture of Chhatrapati Shivaji Maharaj using his own blood in nashik
Updated on

सिडको (नाशिक) : छत्रपती शिवरायांच्या जयंती पार्श्वभूमीवर एका अवलिया चित्रकाराने अक्षरशः स्वतःचे ३० एम. एल. रक्त वापरून 'महाराजांचे' चित्र कागदावर रेखाटले आहे. त्यांनी केलेल्या या अनोख्या अभिवादनाचा प्रयत्न सध्या शिवप्रेमी मध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

सिडको येथील के. बी. एच. विद्यालयातील कलाशिक्षक संजय जगताप यांनी स्व: रक्तातून चित्राची निर्मिती केली आहे. कागदाच्या पानावर स्वतः च्या रक्ताने कुंचल्यातून चित्र काढून वेगळीच शिवजयंती साजरी करत आहेत. जगताप यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पिंपळच्या पानावर देखील असे अनेक चित्रे काढली आहेत.

या सर्व उपक्रमासाठी संस्था चालक डॉ. अपूर्व हिरे ,मुख्यध्यापक ,शिक्षक वर्ग, कौटुंबिक सदस्य व मिञ परिवार यांनी जगताप यांचे कौतुक केले आहे.

painter has drawn a picture of Chhatrapati Shivaji Maharaj using his own blood in nashik
'खुद की ही आबरू..'; संजय राऊतांच्या 'त्या' विधानावर चित्रा वाघ यांचा टोला

चित्रकार संजय जगताप यांनी राबवलेले उपक्रम :

चिमणी बचाव, वाघ बचाव, अनेक राष्ट्रीय ,सामाजिक, राजकीय ,क्रांती कारक देवतांचे यांचे चित्र रेखाटले आहेत. पर्यावरण पूरक शाडूमातीपासून गणपती, पर्यावरण पूरक आकाश कंदील, पतंग असे अनेक उपक्रम विद्यार्थ्यां साठी घेत असतात.

painter has drawn a picture of Chhatrapati Shivaji Maharaj using his own blood in nashik
महाराष्ट्राचे दोन सुपुत्र जवान गणेश कसबे, अशोक इंगवले यांना वीरमरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.