नाशिक : नाशिकच्या (nashik summer onion) उन्हाळ कांद्याच्या भावातील घसरण थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. गेल्या आठवड्याच्या तुलनेत क्विंटलमागे पिंपळगावचा अपवाद वगळता इतरत्र शंभर ते तीनशे रुपयांनी भावात घसरण झाली आहे. निर्यातीवर (export) मर्यादा आल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. पाकचा कांदा (pakistan onion) भारतीय कांद्यापेक्षा सात रुपये किलो भावाने स्वस्त विकला जात आहे. त्याचवेळी मलेशिया, श्रीलंका, बांगलादेश, थायलंडमध्ये लॉकडाउन वाढत आहे. (Pakistani-onion-is-cheaper-than-Indian-onion-nashik-marathi-news)
पाकचा कांदा भारतापेक्षा सात रुपये किलो स्वस्त
कांद्याच्या आगारात गेल्या आठवड्यात उन्हाळ कांद्याला क्विंटलला एख हजार ८०० ते एक हजार ९३० रुपये असा भाव मिळाला. आज एक हजार ६५० ते एख हजार ७५० रुपये क्विंटल या सरासरी भावाने विक्री झाली. देशांतर्गत बाजारपेठेत स्थानिक कांदा पाठविला जात असला, तरीही पुढील महिनाखेरपर्यंत मध्य प्रदेशचा कांदा उपलब्ध होणार असल्याने म्हणावी तितकी मागणी नाही. ‘नाफेड' बाजारभावाप्रमाणे कांद्याची खरेदी करत असले, तरीही निर्यातीचा वेग वाढत नाही. पाकिस्तानच्या कांद्याचा टनाचा भाव २९० डॉलर आहे, तर भारतीय कांद्याचा भाव ३७० डॉलरपर्यंत पोचला आहे. अशातच, अरब राष्ट्रांमध्ये पाकिस्तानचा कांदा पोचण्यासाठी भाडे भारतीय कांद्यापेक्षा कमी असल्याने अरब राष्ट्रांमधील बाजारपेठांमध्ये पाकिस्तानच्या कांद्याला पसंती मिळत आहे. अरब राष्ट्रांच्या व्यतिरिक्त मलेशिया, श्रीलंका, बांगलादेश, थायलंडमध्ये कांदा विकत घेण्याकडील आयातदारांनी लॉकडाउनमुळे आखडता हात घेतलेला आहे. अशा एका परिस्थितीत जुलै आणि ऑगस्टमध्ये देशाच्या विविध भागात पाऊस कसा राहणार, यावर नाशिकच्या कांद्याचा भाव अवलंबून राहण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे निर्यातदार विकास सिंह यांचे म्हणणे आहे. दरम्यान, आशिया खंडातील सर्वांत मोठ्या कांद्याची बाजारपेठ पिंपळगावमध्ये गेल्या आठवड्यात एक हजार ८५१ रुपये क्विंटल या सरासरी भावाने शेतकऱ्यांनी कांदा विकला होता. आज इथे उन्हाळ कांद्याचा सरासरी भाव एक हजार ९०० रुपये असा राहिला. कळवणमध्ये एक हजार ७००, तर उमराणेमध्ये एक हजार ७५० रुपये क्विंटल या सरासरी भावाने कांद्याची विक्री आज झाली.
उन्हाळ कांद्याच्या भावाची स्थिती
(आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये)
बाजारपेठ सोमवार (ता. २८) सोमवारी (ता. २१)
येवला एक हजार ६५० एक हजार ८५०
नाशिक एक हजार ७०० एक हजार ८००
लासलगाव एक हजार ७५० एक हजार ९३०
मुंगसे एक हजार ६०० एक हजार ९००
मनमाड एक हजार ६५० एक हजार ८००
देवळा एक हजार ७०० एक हजार ९००
नामपूर एक हजार ६५० एक हजार ८५०
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.