Nashik News: पालखेड कालव्याला आज आवर्तन सुटणार! दुष्काळी येवल्यासह निफाडमधील शेतकऱ्यांना लाभ

Yeola Palkhed Canal
Yeola Palkhed Canalesakal
Updated on

येवला : शेतात उभ्या असलेल्या पिकांना पाण्याची गरज भासू लागल्याने पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते.

अखेर पाटबंधारे विभागाने मंगळवार (ता. १२)पासून सुमारे ३० ते ३५ दिवसांचे सिंचनाचे पहिले व एकमेव आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दुष्काळी येवल्यासह निफाडमधील टंचाईग्रस्त गावांना पाण्याचा लाभ होणार आहे. (Palkhed Canal avartan will flow today Benefits to farmers in Niphad after drought Nashik News)

यंदा पावसाअभावी खरिपाची पूर्ण वाट लागली. आता पालखेडच्या लाभक्षेत्रात काही प्रमाणात रब्बी हंगाम निघेल, अशी अपेक्षा बळीराजाला आहे.

त्यातही णे विहिरी तळ गाठू लागल्याने घेतलेली पिके जगविण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. धरणे फुल्ल भरले असल्याने पालखेड डाव्या कालव्याला शेती सिंचनासाठी दोन आवर्तने द्यावीत, यासाठी शेतकरी संघटना व प्रहार शेतकरी संघटनेने जोरदार लढा दिला.

शेतकरी संघटनेचे संतू पाटील-झांबरे व सहकाऱ्यांनी थेट मंत्रालयात धडक मारली होती. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकच आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला. आजपासून ३० ते ३५ दिवसांचे आवर्तन सोडण्यात येणार आहे.

पालखेड डावा कालव्याच्या सिंचनाच्या तीस दिवसांच्या अवर्तनात ०.९९९ टीएमसी पाणी शेतीसाठी, तर बिगर सिंचनासाठी म्हणजेच पिण्यासाठी ०.९४६ टीएमसी पाणी एकत्रित सोडण्याचे नियोजन केले आहे.

लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना वितरकेद्वारे, तसेच पिण्यासाठी मनमाड शहर, मनमाड रेल्वे आणि येवला शहर व येवल्याच्या ३८ गाव पाणीयोजनेचे साठवण तलावही या अवर्तनातून भरून दिले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांनी दिली.

दरम्यान, पालखेड प्रशासनाने मार्च २०२४ मध्ये ८०० दशलक्ष घनफूट पाणी दहा दिवसांच्या आवर्तनासाठी, तर मेमध्ये ८५० दशलक्ष घनफूट पाणी न व ऑगस्टमध्ये ३७४ दशलक्ष घनफूट सहा दिवसांचे आवर्तन पिण्याच्या पाण्यासाठी असल्याचे भागवत यांनी सांगितले.

Yeola Palkhed Canal
Nashik News: खंडणी, धमकीचे फोन आल्यास तात्काळ पोलिसांना कळवा; पोलीस आयुक्तांचे आवाहन

या आवर्तनातून शेतकरी पिकांना मुबलक पाणी देऊ शकतील. शेततळ्यांसह इतर पाणीसाठ्यात पाणी घेणार असल्याने व भूजल पातळी वाढणार आहे. कांदा, गहू, हरभऱ्यासह इतर पिकांसाठी याआवर्तनाचा मोठा फायदा होणार आहे.

येत्या दोन-अडीच दिवसांत पाणी निफाड तालुक्यात, तर चार ते पाच दिवसांत येवल्यात पाणी पोहोचणार आहे.

"करंजवण व वाघाड धरणातील पाणी पालखेड धरणात घेऊन आवर्तन सोडण्याचे नियोजन केले आहे. शेतीसाठी ३० ते ३५ दिवसांचे आवर्तन असून, यात पिण्यासाठी आरक्षित योजनांना पाणी देण्यात येणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यात पिण्यासाठी तीन आवर्तनांचे नियोजन केले आहे. "-वैभव भागवत, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, नाशिक

"पालखेड डाव्या कालव्यास अखेर पाणी सुटणार असून, मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील दोन ते तीन गावे सोडल्यास संपूर्ण तालुक्यातील पाण्याअभावी जळणाऱ्या पिकांना संजीवनीच मिळाली होती. आवर्तन खूपच चर्चेचा विषय ठरून पाणी येणार, की नाही. हातातोंडाशी आलेले पीक वाचतील का , अशा दोलायमान मनस्थितीत असलेल्या शेतकऱ्यांना आम्ही उपलब्ध पाण्याची सविस्तर आकडेवारी देत पाणी मंजुरीसाठी ठोस पाठपुरावा केला. प्रशासनाने योग्य नियोजन करून शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोच करावे. कुणीही शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांनीही प्रशासनास सहकार्य करावे. "

-हरिभाऊ महाजन, तालुकाध्यक्ष, प्रहार शेतकरी संघटना, येवला

Yeola Palkhed Canal
NMC News: मनपा शिक्षकांना आजपासून प्रशिक्षण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.