Nashik News : श्रीभगवतीची पंचामृत महापूजा; चैत्रोत्सवात लाखो भाविक आदिमायेचे घेणार दर्शन

Tehsildar and Trustee Bandu Kapse during the second garland of Adimaye's Chaitrotsav with attractive floral arrangements and consort Panchamrit Mahapuja.
Tehsildar and Trustee Bandu Kapse during the second garland of Adimaye's Chaitrotsav with attractive floral arrangements and consort Panchamrit Mahapuja.esakal
Updated on

वणी (जि. नाशिक) : चैत्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आद्यपीठ आदिमाया सप्तशृंगीचे वीस हजार भाविकांनी दर्शन घेतले. धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील लाखांवर पदयात्रेकरू आदिमायेचा जयघोष करीत, डीजेवरील गाण्यांवर ताल धरीत गडाच्या दिशेने मार्गक्रमण करीत गडापासून शंभर ते दीडशे किलोमीटर अंतरापर्यंत दाखल झाले आहेत.

शुक्रवारी (ता. ३१) श्रीभगवतीची पंचामृत महापूजा तहसीलदार तथा न्यासाचे पदसिद्ध विश्वस्त बंडू कापसे यांनी सपत्नीक केली. (Panchamrit Mahapuja of Shri Bhagavati Lakhs of devotees will have darshan of saptashrungi during Chaitrotsav Nashik News)

सप्तशृंगी चैत्रोत्सवकाळात भाविकांची कुठल्याही पद्धतीने गैरसोय होऊ नये, त्यादृष्टीने गडावर मंदिर, पहिली पायरी, शिवालय तलाव, न्यासाचे कार्यालय उदभोदन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आपत्तीसाठी २४ तास अग्निबंब सुविधा व प्रथमोपचार केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.

न्यासाच्या धर्मशाळा, मंदिर, पहिली पायरी, प्रसादालय, भक्तगण आदी ठिकाणी पदयात्रेकरूंना पिण्यासाठी चार पाण्याचे टॅंकर सुरू केले आहे. शिवालय तलाव परिसरात भाविकांसाठी मंडप टाकण्यात येत आहे. गड परिसर स्वच्छतेसाठी ५० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

ग्रामपंचायतीनेही स्वच्छतेसाठी व पाणीपुरवठ्यास अग्रक्रम देत स्वच्छतादुतांची नेमणूक केली आहे. देवनळी, गंगा, जमुना कुंड, धोंड्या-कोंड्या विहिरीची स्वच्छता करून भाविकांना त्यातील पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. दरम्यान, गडावर प्रसाद, हार, कुंकू, हॉटेल व्यावसायिकांनी यात्रोत्सवानिमित्त दुकानाची सजावट केली आहे.

परिसरातील आदिवासी बांधवांचीही गडाकडे येणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी हॉटेल, पूजा साहित्य, प्रसादाची विक्रीची दुकाने थाटण्यासाठी लगबग सुरू आहे. शनिवार (ता. १)पासून गडावर गर्दी होणार असल्याचा अंदाज आहे. न्यासाच्या प्रसादालयात आज सहा हजार भाविकांनी मोफत महाप्रसादाचा लाभ घेतला आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Tehsildar and Trustee Bandu Kapse during the second garland of Adimaye's Chaitrotsav with attractive floral arrangements and consort Panchamrit Mahapuja.
Market Committee Election : मालेगाव बाजार समितीसाठी 47 अर्ज दाखल; भुसे, हिरे पॅनलमध्ये सरळ लढत

लाइव्ह दर्शनासाठी संकेतस्थळ

आदिमायेचे लाइव्ह दर्शनासाठी ट्रस्टने भाविकांना https://ssndtonline.org/0p=home/live_darshan हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. तसेच, मंदिराच्या पहिली पायरी प्रवेशद्वारावर भाविकांना आदिमायेचे थेट दर्शनासाठी १० बाय ८ फुटांची एलईडी स्क्रीन आजपासून कार्यान्वित करण्यात आली आहे.

या वेळी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, पहिली पायरी कार्यालयप्रमुख गोविंद निकम, नानाजी काकळीज, अधीक्षक प्रकाश जोशी, किरण राजपूत, नरेंद्र सूर्यवंशी, मुरली गावित, श्याम पवार, सुहाना मसाल्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. स्क्रीन ही कायमस्वरूपी ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

Tehsildar and Trustee Bandu Kapse during the second garland of Adimaye's Chaitrotsav with attractive floral arrangements and consort Panchamrit Mahapuja.
Deola Market Committee Election : निवडणूक बिनविरोध होणार की चुरशीची? 51 उमेदवारी अर्ज दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.