वणी दरबारात प्रथमच सर्वसामान्य भाविकांच्या हस्ते पंचामृत महापूजा

Panchamrut Mahapuja by common devotees for the first time in vani saptashrungi temple
Panchamrut Mahapuja by common devotees for the first time in vani saptashrungi templeesakal
Updated on

वणी (जि. नाशिक) : आदिमाया सप्तशृंगीदेवीच्या (Saptashrungi Devi) चैत्रोत्सवाच्या आज दुसऱ्या दिवशी सुमारे चाळीस हजार भाविकांनी दर्शन घेतले. धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील हजारो खानदेशवासिय आग ओकणाऱ्या सूर्याची पर्वा न करता गडाच्या दिशेने मार्गक्रमण करीत सव्वाशे ते दीडशे किलोमीटरपर्यत दाखल झाले आहेत. दरम्यान आज दर्शनरांगेत असलेल्या भाविक दांपत्यास श्री भगवतीच्या पंचामृत महापूजेचा बहुमान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने देऊन चांगल्या पायंड्यास सुरुवात केल्याने भाविक व ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

अशी झाली निवड

श्री सप्तशृंगी मातेच्या चैत्रौत्सवातील आजच्या दुसऱ्या दिवशी भगवतीच्या पंचामृत महापूजेचा मान कोणत्याही पूर्व कल्पनेशिवाय मंदिर परिसरात दर्शनरांगेतून सभामंडपात पोहचललेल्या दर्शनार्थी व अनोळखी प्रकारातील भाविकाला देण्याचे नियोजन श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने केले होते. त्यानुसार आज त्यानुसार पंचामृत महापूजेवेळी दर्शनरांगेत असलेले नामदेव कोळी (५६, रा. पिंपळगाव,ता. भुसावळ, जि. जळगाव) यांना सपत्नीक आदिमायेच्या पंचामृत महापूजेचा मान देण्यात आला. न्यासाचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, इस्टेट विभाग प्रमुख प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे उपस्थित होते.

Panchamrut Mahapuja by common devotees for the first time in vani saptashrungi temple
मालेगाव : चैत्रोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांच्या डीजेवर दगडफेक

दरम्यान आज सकाळी पारंपरिक पध्दतीने आदिमायेच्या आभूषणांचे ट्रस्ट कार्यालयात पूजन होऊन अलंकारांची आदिमायेच्या जयघोषातात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. चैत्रोत्सवानिमित्त आदिमायेच्या मंदिरात रंगबेरंगी आकर्षक फुलांच्या माळांची केलेली आरास व त्यात आदिमायेस सफेद (शुभ्र) महावस्त्र परिधान करुन सोन्याचे मोठे मंगळसूत्र, वज्रटिक, गुलाबहार, मयूरहार, कमरपट्टा, नथ, तोडे, कर्णफुले, पाऊले आदी सोन्यांचे अलंकार घालून साजशृंगार करण्यात आला होता. आदिमायेची हर्षीत, प्रफुल्लित असलेल्या मूर्तीच्या दर्शनाने भाविक आनंदाने भारावले होते. दुपारी उन्हामुळे गर्दीचे प्रमाण कमी झाले मात्र दुपारी तीननंतर गर्दीत पुन्हा वाढ झाली.

Panchamrut Mahapuja by common devotees for the first time in vani saptashrungi temple
परिस्थितीला नमवत पुष्पाताईंचा भांडेविक्रीचा प्रवास पोहोचला शोरुममध्ये

"आई भगवतीच्या दरबारात सर्व भाविकांना समान न्याय असावा या उद्देशाने विश्वस्त मंडळाने आज सर्वसामान्य भाविकास पंचामृत महापूजेचा मान दिला. असेच वेगवेगळे उपक्रम विश्वस्त मंडळ राबवत असून यापुढील काळातही देणगीदार यजमान भाविकाबरोबरच दर्शन रांगेतील सर्वसाधारण भाविकासही पंचामृत महापूजेचा मान देण्यासाठी विश्वस्त मंडळाचा प्रयत्न राहील."
- सौ. मन्यज्योत पाटील, विश्वस्त, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट.


"मागील काही दिवसांपूर्वी मुलाच्या अपघाताचा प्रसंग श्री भगवतीच्या कृपेने त्यातून मुले सुखरूप वाचल्यानंतर आई सप्तशृंगीला केलेला नवस फेडणे तसेच त्यासाठी मागील २५-३० वर्षांपासून सालाबादप्रमाणे दर्शनाला येण्याच्या विचाराने गडावर आलो. ट्रस्टच्या कार्यकारिणी मंडळ व व्यवस्थापनाने दिलेली पंचामृत महापूजेची संधी हा अविस्मरणीय योग आहे. आईनं आज ट्रस्टच्या माध्यमातून पदराखाली घेवून आम्हा कुटुंबियांना अभूतपूर्व सेवेची संधी दिली. आम्हाला श्रद्धेची अचानक पावती मिळाली, आम्ही... धन्य झालो."
- नामदेव कोळी, (पंचामृत महापूजेचा मान मिळालेले भाविक, पिंपळगाव, भुसावळ)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()