Panchavati Express : पंचवटी एक्स्प्रेसला मिळाले 11 नवीन कोच; सेपरेट रेकची मागणी मात्र अजून अपूर्णच

Panchavati Express got 11 new coaches nashik news
Panchavati Express got 11 new coaches nashik newsesakal
Updated on

Panchavati Express : नाशिककरांची प्रवास वाहिनी असणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसला ११ नविन डबे मिळाले. पंचवटी एक्सप्रेसला २०१८ पासून एलचबी रेक लावण्यात आला.

परंतु पहिल्या दिवसापासूनच प्रवाशांनी नविन रेकला नापसंती दाखवली व त्याबद्दल आंदोलनेदेखील झाली होती. (Panchavati Express got 11 new coaches nashik news)

प्रवाशांच्या आंदोलनाला यश आल्याचे समाधान आहे, मात्र पंचवटीच्या सेपरेट रेकची मागणी अजून अपूर्णच राहिल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी नोंदवली आहे. एप्रिल महिन्यात देखभाल करण्याच्या कारणास्तव जवळपास १३ डबे काढून त्याजागी जुने व प्रवाशांना त्रासदायक डबे जोडण्यात आले.

याबाबात मासिक पासधारक व प्रवासी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष राजेश फोकणे, किरण बोरसे, सुदाम शिंदे यांच्यासह दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास पत्रव्यवहार करून पंचवटी एक्स्प्रेसला समोरासमोर आसन व्यवस्था असणारे नविन डबे देण्यात यावी, अशी मागणी केली होती.

सकाळ’ने हा मुद्दा प्रकाशात आणला होता. याची दखल घेउन प्रशासनाने प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Panchavati Express got 11 new coaches nashik news
Success Story : कष्टाच्या जोरावर अविनाशची यशाला गवसणी! देशसेवेसाठी लष्करात दाखल

या साठी राजेश फोकणे यांच्यासह उपाध्यक्ष व विभागीय सल्लागार समिती सदस्य किरण बोरसे, सचिव संजय शिंदे, कार्याध्यक्ष कैलास बर्वे, खजिनदार दीपक कोरगावकर, नितीन जगताप, सुदाम शिंदे, रतन गाढवे, संतोष गावंदर, गणेश नागरे, सुनील केदारे, ॲड. क्रांती गायकवाड, उज्ज्वला कोल्हे आदी पदाधिकाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले.

"या निर्णयाचे व अंमलबजावणीचे प्रवाशांच्या मनात काही प्रमाणात समाधान असून, सेपरेटर रेकची मागणी अपूर्णच राहिल्याचे दुःख आहे. या संदर्भात रेल्वे प्रशासनाला राहिलेल्या मागण्या संबंधी चर्चा करून निवेदने दिली जाणार आहेत आणि प्रश्न मार्गी लावण्यात प्रशासकीय पातळीवर गतिमानता आणली जाईल." - राजेश फोकणे, प्रवासी संघटना.

Panchavati Express got 11 new coaches nashik news
Gatari Amavasya 2023 : 'गटारी' नाही रे भाऊ, 'गतहारी अमावस्या'! जाणून घ्या गतहारी अमावस्येचा अर्थ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.