मनमाड (जि.नाशिक) : नाशिक जिल्ह्याची (nashik district) जीवनवाहिनी समजली जाणारी मनमाड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई पंचवटी कोविड स्पेशल एक्स्प्रेस (panchvati express) तब्बल दोन महिन्यांनंतर आजपासून पुन्हा प्रवाश्यांच्या सेवेत सुरू झाल्याने नाशिक- मुंबई प्रवाशांची चांगली सोय झाली आहे (Panchavati-Express-in-passenger-service- again-marathi-news)
दोन महिन्यांनंतर पुन्हा प्रवाश्यांच्या सेवेत सुरू
आज (ता.२५) पहिलाच दिवस असल्याने तसा प्रवाशांचा थंड प्रतिसाद होता. आरक्षण करून या गाडीने प्रवास करता येणार आहे. कोरोना दुसऱ्या लाट व लॉकडाऊनमध्ये प्रवाशांचा अल्प प्रतिसादामुळे रेल्वे प्रशासनाने पंचवटी एक्स्प्रेस दोन महिन्यांपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पंचवटी एक्स्प्रेस सुरू झाल्याने प्रवाशी आनंदित आहे. कोरोना संसर्गापासून बचाव करणारे सर्व उपाय योजना रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.पंचवटीसह जालना - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्स्प्रेस आजपासून धावणार आहे. मनमाड- नाशिक व नाशिक मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठीही विशेष गाडी सुरू करण्याची मागणी होत आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.