अखेर पंचवटी एक्स्प्रेस होणार सुरू! नाशिक-मुंबई प्रवास सोयीचा

panchavati express
panchavati expressesakal
Updated on

नाशिक रोड : प्रदीर्घ कालखंडानंतर येत्या शुक्रवार (ता. २५)पासून मनमाड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पंचवटी एक्स्प्रेस (panchvati express) सुरू होणार आहे. चाकरमान्यांसाठी या गाडीला पास मंजूर करावा, अशी मागणी प्रवासी संघटनेसह रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांनी केली. (Panchavati-Express-will-start-from-tomorrow-nashik-marathi-news)

प्रवाशांसाठी पासची सुविधा द्यावी; प्रवासी संघटनेची मागणी

१ नोव्हेंबर १९७५ ला पंचवटी एक्स्प्रेस सुरू झाली. तेव्हापासून नाशिककरांना एका दिवसात नाशिक-मुंबई व मुंबई-नाशिक असा प्रवास करणे सोयीचे झाले. या गाडीने नाशिकच्या सर्वांगीण विकासाला आजपर्यंत चालना दिली आहे. रोज ८०० ते ९०० प्रवासी या गाडीने मुंबईपर्यंत प्रवास करतात. कोरोनामुळे ही गाडी बंद होती. आता ही गाडी २५ जूनपासून सुरू होत आहे. या गाडीमुळे नोकरदार, व्यावसायिक, चाकरमाने, विद्यार्थी, शेतकरी व महिलांची सोय होणार आहे. या गाडीला १६ डबे असतील, अशी माहिती रेल्वे सल्लागार समितीचे राजेश फोकणे यांनी दिली. नोकरी, कामानिमित्त रोज मुंबई ते नाशिक प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पासची सुविधा करावी, अशी मागणी प्रवासी संघटनेसह रेल्वे सल्लागार समितीने केली. यासंदर्भात रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गुरमितसिंग रावल यांनी रेल्वे बोर्डाला पत्र पाठविले आहे. या पत्रावर प्रवाशांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

पंचवटी सुरू झाली. मात्र, प्रवास परवडायला पाहिजे. आरक्षणासाठी वेळ वाया जाऊ नये, म्हणून रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेने पास द्यावा. यासाठी आम्ही रेल्वेला पत्र दिले आहे. याची अंमलबजावणी झाली नाही, तर रेल्वे प्रवासी संघटना नाशिक रोड आणि मनमाड रेल्वे स्थानकावर आंदोलन करेल. -गुरमितसिंग रावल, अध्यक्ष, प्रवासी संघटना

नाशिक-मुंबई शासकीय सेवेत असणाऱ्या प्रवाशांना रेल्वेने ओळख तपासून पास मंजूर करायला हवा. रोज आरक्षण करणे परवडणार नाही. त्यामुळे रेल्वेने प्रवाशांचा प्रश्न ‘पंचवटी’ सुरू होण्याच्या आतच सोडविला पाहिजे. यासंदर्भात आम्ही रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. -राजेश फोकणे, सदस्य, रेल्वे सल्लागार समिती

panchavati express
काळ्या बाहुलीची जादू अन्‌ पैशांचा पाऊस! नाशिकमधील प्रकार
panchavati express
नाशिकच्या भाजप नगरसेवकांच्या मुंबई वारीने खळबळ!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.