NMC News: खरोखर दुरुस्तीची आवश्यकता आहे का? पंचवटी, नाशिक रोड विभागात शौचालय दुरुस्तीची कामे

NMC Nashik News
NMC Nashik Newsesakal
Updated on

NMC News : नागरिकांच्या वाढत्या तक्रारींच्या अनुषंगाने बांधकाम विभागाकडून शहरात शौचालय दुरुस्तीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

खरोखर दुरुस्तीची आवश्यकता आहे का, फक्त होऊ द्या खर्च अशी भूमिका आहे, हादेखील एक संशोधनाचा भाग असून चौकशी होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. (Panchavati Nashik Road Section Toilet Repair Works NMC News nashik)

महापालिका हद्दीतील पंचवटी विभागाचा भौगोलिक विस्तार हा जवळपास ११० चौरस किलोमीटर आहे. पंचवटी विभागामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेकडून ४६ सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृह, तसेच महिलांसाठी वीस शौचालय बांधण्यात आले आहेत.

शौचालय व स्वच्छतागृहाचा दैनंदिन वापर होत असल्याने त्या सुस्थितीत राखणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेकडून बजेटमध्ये तरतूददेखील करण्यात आली आहे. २०२२ व २३ च्या बांधकामाच्या दरानुसार ४९ लाख ३६ हजार ८८४ रुपये पंचवटी विभागातील सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृह दुरुस्तीसाठी खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे नाशिक रोड विभागातील दलित व मागासवर्गीय वस्ती, झोपडपट्टी भाग व देवळाली, वीरगाव, वडनेर व पिंपळगाव व इतर गावठाण परिसरातदेखील मोठ्या प्रमाणात सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाची बांधणी करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC Nashik News
NMC RRR Centre News : समाजातील माणुसकी हरपली काय? दीड महिन्यात केवळ एकाची मदत..

तेथेदेखील बांधणी व दुरुस्तीचा खर्च केला जाणार आहे. पंचवटी विभागात नागरिकांच्या तक्रारीनुसार शौचालय दुरुस्तीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे, तर नाशिक रोड विभागात मात्र शौचालयांची नादुरुस्ती नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणू शकते, असे कारण देत दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पंचवटी व नाशिक रोड विभागातील शौचालय दुरुस्तीची कामे अचानक निघाल्याने यामागे होऊ द्या खर्च अशीच भूमिका असल्याचे बोलले जात असून अंदाजपत्रकात करण्यात आलेली आर्थिक तरतूद संपविण्याचाच हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

NMC Nashik News
NMC News: 2 महिने उलटले तरी घंटागाडी चौकशीचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यात! कारवाईची प्रतीक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()