Nashik News: बागलाण तालुक्यात तातडीने सरसकट पंचनामे करावेत; शेतकर्‍यांचे तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन

Farmers protest at Tehsil office
Farmers protest at Tehsil officeesakal
Updated on

Nashik News : बागलाण तालुक्यातील एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असतानाही तालुका प्रशासनाकडून बाधित पिकांचे पंचनामे करण्यास अक्षम्य दुर्लक्ष करून शेतकर्‍यांना अडचणीत आणले जात आहे.

शासकीय अधिकाऱ्यांनी दिरंगाई न करता अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी तातडीने सरसकट पंचनामे करावेत यांसह विविध मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या संतप्त शेतकर्‍यांनी बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात तासभर ठिय्या आंदोलन छेडले. (Panchnama should be done immediately in Baglan taluka Farmers protest at Tehsil office Nashik News)

दरम्यान, उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांनी शेतकर्‍यांची भेट घेऊन तत्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिल्याने शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेतले. आज सकाळी माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकर्‍यांनी ‘सरसकट पंचनामे झालेच पाहिजे’, ‘बळीराजाला नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे’ यांसह प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत बागलाण तहसीलदारांच्या दालनात ठिय्या दिला.

आंदोलनाची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांनी तत्काळ तहसील कार्यालय गाठून शेतकर्‍यांची भेट घेतली. यावेळी बोलताना माजी आमदार श्री.चव्हाण म्हणाले, सटाणा शहर ब बागलाण तालुक्‍यात गेल्या आठ दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व गारपीटीने थैमान घातल्याने हजारो हेक्टरवरील कांदा, द्राक्ष, डाळींब, गहू, हरभरा, टोमॅटो, मिरची, काकडी यांसह सर्व शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून बळीराजा उद्‌ध्वस्त झाला आहे.

शेतीपिकासाठी घेतलेले पीककर्जही फेडू शकत नसल्यामुळे शेतकऱ्यांची आथिक कोंडी होत असून कुटुंबाचाही उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्‍न आता त्यांच्यासमोर उभा आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याच्या खंत व्यक्त केल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बागलाण दौर्‍यात सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले असतांनाही प्रशासनाकडून कोणतीही अंमलबजावणी दिसून येत नसल्याचे चित्र आहे. संकटाच्या काळात प्रशासनाकडून अन्नदात्या बाधित शेतकऱ्यांना अडचणीत आणले जात असल्याच्या तक्रारी शेतकर्‍यांनी केल्या आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे.

नुकसानभरपाई मिळाली नाही तर कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. त्यामुळे शहर व तालुक्‍यात सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करावेत आणि जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी यासाठी तालुक्‍यातील तलाठी, कृषी अधिकारी, ग्रामसेवक यांना पंचनामे करण्यात दिरंगाई करू नये याबाबत कडक सुचना देण्याची मागणीही श्री.चव्हाण यांनी केली.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Farmers protest at Tehsil office
NDA Admission : ‘एनडीए’ प्रवेश प्रक्रियेस भोसला कॅम्पसमध्ये प्रतिसाद; येत्‍या रविवारी पुन्‍हा संधी

यावेळी राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष संजय पवार, जिभाऊ सोनवणे, यशवंत कात्रे, रत्नाकर सोनवणे आदि शेतकर्‍यांची भाषणे झाली.

आंदोलनात पांडुरंग सोनवणे, माधव सोनवणे, हिरामण गांगुर्डे, हितेंद्र बागूल, ज.ल.पाटील, शेखर सोनवणे, राजेंद्र सोनवणे, भास्कर सोनवणे, बापू येवला, रमेश सोनवणे, अनिल कापडणीस, हरिभाऊ खैरणार, सुभाष पाटील, राजेंद्र पवार, आकाश सोनवणे, स्वप्नील सोनवणे, निंबा सोनवणे, शिवाजी सोनवणे आदींसह शेतकरी सहभागी होते.

आंदोलक शेतकर्‍यांच्या मागण्या :

▪ पीककर्ज माफ करावे.

▪ कृषी पंपांची थकीत बिले माफ करावीत.

▪ नुकसानग्रस्त फळबागांसाठी हेक्‍टरी दोन लाख रुपये अनुदान द्यावे.

▪ मागील वर्षी काढलेल्या पीकविम्याची रक्‍कम त्वरीत मिळावी.

▪ कांदा अनुदानासाठी सातबार्‍यावर पिकाची नोंद असलेली अट रद्द करावी.

▪ द्राक्ष उत्पादकांना द्राक्ष बागांबरील प्लास्टिक आच्छादनासाठी १०० टक्के अनुदान द्यावे.

▪ गारपीट झालेल्या भागामध्ये तीन वर्ष काही उत्पन्न निघणार नसल्यामुळे बाधीत शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज घोषित करावे.

▪ अवकाळी पाऊस व गारपीट झालेल्या गावांमध्ये तात्काळ सरसकट पंचनामे करावे.

Farmers protest at Tehsil office
Shivaji Chumbhale : पकडवॉरंटचा विरोधकांकडून निवडणुकीमुळे अपप्रचार : चुंभळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.