पंचवटी (जि. नाशिक) : नाशिक शहर परिसरात मुख्य रस्त्यावरून वाहनांची मोठ्या वर्दळ सुरू असते. सर्वसामान्यांना पादचाऱ्यांच्या चालण्यासाठी खास पादचारी मार्ग तयार करण्यात आलेले आहेत. मात्र, या पादचारी मार्गाचा वापर सद्यःस्थितीत खाद्यपदार्थांसह विविध प्रकारच्या वस्तूंची, फळ विक्री करणाऱ्या विक्रेते करीत असल्याने हे ‘स्मार्ट’ अतिक्रमण नागरिकांसाठी एक मोठी अडचणी होत आहे. (Panchvati Division encroachments on footpath Nashik News)
हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...
विशेष म्हणजे, शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबविली जाते. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाचे या समस्येकडे का लक्ष जात नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहरातील काही भाग तर असे आहेत की, तेथे पादचारी मार्गच नाहीत.
त्यामुळे नागरिकांना थेट रस्त्यावरूनच चालण्याचे वेळ येते. अशा वेळी वाहनांचा धक्का लागून अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. पंचवटीत दिंडोरी नाका, निमाणी बसस्थानकाच्या बाहेरील भाग, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर, दिंडोरी रोड, म्हसरूळ आदी परिसरातील पादचारी मार्गावर विक्रेते बसलेले असतात. दिंडोरी नाक्याकडून निमाणीकडे असलेल्या पादचारी मार्गावर हातगाडे आहेत.
सध्या हा मार्ग खोदण्यात आलेला आहे. येथे पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झालेले असलेतरी खोदकाम पूर्णपणे बुजविण्यात आलेले नाही. त्यामुळे अतिक्रमणामुळे कोंडी वाढली आहे. पंचवटीकडून दिंडोरी नाक्याकडे जाणारा भाग त्यात बेकरी दुकानांनी पादचारी मार्गच व्यापला गेला आहे. तसेच दिंडोरी रोडने मार्केट यार्डकडे जाणाऱ्या मार्गावर तर पादचारी मार्गच गायब झालेला आहे. या भागात रिक्षा, टॅक्सी थांबलेल्या असतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.