Nashik News: काट्या-कूट्याचा तुडवित रस्ता, गावाकडे चल माझ्या दोस्ता! डोंगरकुशीत शाळेचे रंगले वनभोजन

Small students enjoying forest food in the mountain valley.
Small students enjoying forest food in the mountain valley.esakal
Updated on

Nashik News : ‘काट्या-कुट्याचा तुडवित रस्ता, माझ्या गावकडे चल माझ्या दोस्ता’ या काव्यपंक्तीला साजेसा उपक्रम राबविला तो पांडववाडी, नायगव्हाण व म्हसोबावाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेने.

विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्याचा अनुभव देण्यासाठी सहज शालेय उपक्रमातर्गंत वनभोजनाचे आयोजन केले होते. (Pandavwadi Naigavan Mhasobawadi schools colorful vanbhojan in hills nashik)

वर्षभर सतत अभ्यासात व्यस्त असणाऱ्या मुलांना थोडासा विरंगुळा म्हणून वजभोजनाची मौज न्यारीच असते. नायगव्हाणच्या उंच डोंगरावर असणारे अंबिका देवीचे मंदिर, हरिणासाठी प्रसिद्ध असलेले अरण्य, तसेच धबधबे, असा निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी मुलांची झुंबड उडाली होती.

वळणावळणाची पायवाट, डोंगरावर चढत, चिखल तुडवत, खळखळणाऱ्या झऱ्यांमधून आनंद लुटत चिमुकल्यांचा प्रवास सुरू झाला.

ठिकाण उंचावर असल्यामुळे ‘जय भवानी जय शिवाजी’ची घोषणा, बडबड गीत, शालेय कविता, गाण्यांच्या भेंड्या, शब्दांच्या भेंड्या, असा गंमतीदार हा प्रवास ठिकाणापर्यंत जाऊन पोहोचला.

सर्वप्रथम देवीच्या मंदिरात सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी दर्शन घेतले. या ठिकाणी असणारी रानफुले शोधणे, वेगवेगळे वृक्ष, पाणीपुरवठा करणारे मोठे धरण, ५० हरणांचा मोठा कळप सर्व मुलांच्या नजरेस पडला.

मुलांना खूप आनंद झाला. खेळून झाल्यानंतर सर्व मुलांनी गोलाकारमध्ये बसून श्लोकच्या गजरात भत्ता व लाडू, अशा जेवणाचा आस्वाद घेतला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Small students enjoying forest food in the mountain valley.
Nashik News: मांजरपाडाचे पाणी भागवते येवल्याची तहान! मोहन शेलार

गोलाकार बसून नृत्य, गाणी, नकला, विविध प्राण्यांचे आवाज, लंगडी खेळ आणि साऊंड सिस्टिमच्या गाण्यावर मुलांसह शिक्षकांनीही ताल धरला. पावसाच्या हलक्या हलक्या सरीत भिजण्याचा आनंद व मनसोक्त बागडण्याचा आनंद मिळाल्यामुळे मुले प्रसन्न दिसत होती.

परतीचा प्रवास शाळेपर्यंत चालतच पूर्ण केला. तिन्ही शाळेचे मिळून जवळपास १५० विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. स्थळांची माहिती दिल्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली.

पर्यावरण स्वच्छतेचे महत्व मुलांना लहान वयातच या माध्यमातून समजले. कुसमाडी केंद्रप्रमुख शांताराम काकड, संदीप शेजवळ, सतीश जाधव, बालाजी नाईकवाडी, चंद्रभान पवार, जयसिंग पिंपळे, प्रकाश वर्पे, सविता कर्डिले यांनी नियोजन केले.

"सहशालेय उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नवीन काहीतरी शिकण्याची, निसर्ग पाहण्याची सवय लागते. या उपक्रमाने विद्यार्थ्यांना निसर्ग, झाडेझुडपे, डोंगर, हरणे या गोष्ठी शिकायला मिळाल्या. हा कौतुकास्पद उपक्रम असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण ज्ञानात भर घालणारा हा उपक्रम आहे."

-शांताराम काकड, केंद्रप्रमुख, कुसमाडी

Small students enjoying forest food in the mountain valley.
Nashik : मूकबधिर दिव्यांगाची पैठणी पाहून PM मोदी भारावले! राष्ट्रीय हातमागदिनी दिल्लीत कापसे पैठणीचे कौतुक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.