National Youth Festival : ‘पंढरपूरची वारी देशात भारी’; राष्ट्रीय युवा महोत्सवात पहिल्यांदाच घोषित

जात, धर्म आणि स्वत:च्या दु:खाला विसरून विविधतेतून एकता प्रस्थापित करणारी ‘पंढरपूरची वारी देशात भारी’ ठरली आहे.
national youth festival
national youth festivalesakal
Updated on

National Youth Festival : दोन हात जोडून आपले मस्तक त्याच्या चरणांशी टेकविले की विठ्ठल आपल्याला पावतो, या साध्याभोळ्या भावनेतून दरवर्षी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या वारकऱ्यांचा उत्साह ‘पंढरपूरची दिंडी’ या लोकनृत्यातून सादर झाला.

जात, धर्म आणि स्वत:च्या दु:खाला विसरून विविधतेतून एकता प्रस्थापित करणारी ‘पंढरपूरची वारी देशात भारी’ ठरली आहे. (pandharpurchi wari Announced for first time at National Youth Festival nashik news)

राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या २७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच देण्यात आलेले सर्वसाधारण गटाचे विजेतेपद धाराशिव येथील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने पटकावले. पंढरपूरच्या वारीचे यथार्थ चित्रण सादर करताना २० युवक-युवतींनी वारकऱ्यांची भूमिका साकारली. १४ मिनिटांच्या या लोकनृत्यात भजन, अभंग, विठ्ठलाची गाणी व भक्तिरस ओथंबून भरलेला आहे. डोक्यावर तुळशी वृंदावन, हात टाळ-मृदंग घेऊन विठुनामाचा गजर करीत आषाढी-कार्तिकीला वारकरी उत्साहाने पंढरपूरला जातात.

आपली जात, धर्म अन्‌ स्वत:चे दु:ख विसरून अपार उत्साहाने दरवर्षी दिंडीत जाणाऱ्या वारकऱ्यांचे चित्रण या लोकनृत्यातून तुळजापूरचे विशाल टोले यांनी सादर केले. विविधतेत एकता असल्याने देशाची अखंडता अबाधित आहे, याचे यथार्थ वर्णन या दिंडीतून सादर झाल्याने युवा महोत्सवात महाराष्ट्राचा डंका वाजला. दीड लाखाचा धनादेश व आकर्षक चषक हाती घेताना ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘संत तुकाराम महाराज की जय’ असा जयघोष झाला.

national youth festival
National Youth Festival Nashik : विविध राज्यांतील खेळाडूंनी गजबजले तपोवन; राष्ट्रीय युवा महोत्सवाची तयारी पूर्ण

विशाल टोले यांनी लोकनृत्याचे दिग्दर्शन केले असून, विशाल शिंगाडे यांनी सहकार्य केले. सुजित माने (गायक), रमण भोईभार (मृदंग), अश्विनी माने (गायिका), सागर चव्हाण (टाळ) यांनी साथसंगत केली. वारकरी म्हणून ऋषीकेश गवळी, सुमेध शीलवंत, किशोर कसबे, संकेत नागणे, वैष्णवी नागटिळक, अंकिता माने, तनुजा शिंदे, प्रियंका पोतदार, अंबिका आगळे यांनी भूमिका साकारली; तर विश्वनाथ काळे, अक्षय दिवटे, सुगत सोनवणे यांनी व्यवस्थापनाची बाजू सांभाळली.

''महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारी ‘पंढरपूरची दिंडी’ या लोकनृत्यातून विविधतेतून एकता दाखवून दिली. दरवर्षी वारकऱ्यांचा उत्साह वाढताना दिसतो. यामागे एकच प्रेरणा दिसून येते, ती म्हणजे दोन हात जोडले, पायी मस्तक ठेवले तरी आपल्याला विठ्ठल पावतो, हे यातून दिसून येते. त्यामुळे परीक्षकांना आमचे लोकनाट्य आवडले असावे. देशभरात हे लोकनाट्य घेऊन जाणार आहोत.''- विशाल टोले, दिग्दर्शक (पंढरपूरची दिंडी लोकनृत्य)

national youth festival
National Youth Festival : महाराष्ट्र संघाचे विद्यार्थी युवा महोत्सवाच्या स्पर्धेत नाहीत

''वारकरी आणि पंढरपूर यांचे अतूट नाते निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील लोकांना याविषयी सांगण्याची गरज नाही; पण युवा महोत्सवाच्या माध्यमातून आपली संस्कृती देशभर पोहोचल्याचा आनंद वाटतो.''- ऋषीकेश गवळी, कलावंत

''लोकनाट्य म्हटले की महाराष्ट्रातील प्राचीन कला, संस्कृती आपल्या डोळ्यांसमोर येते. पण, हीच संस्कृती आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करते, याचा विशेष आनंद वाटतो. इतर राज्यांतील कलाकृतीपेक्षा महाराष्ट्राची लोकसंस्कृती सरस असल्याचे या निकालातून सिद्ध झाले आहे.''- सुमेध शीलवंत, कलावंत

''राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते; पण युवा महोत्सवाने आमचे स्वप्न पूर्ण केले. कलावंत म्हणून वारकऱ्याची भूमिका साकारताना आता प्रत्यक्ष विठ्ठलच पावल्याची अनुभूती येत आहे.''- किशोर कसबे, कलावंत

national youth festival
National Youth Festival: साहसी खेळांची युवा महोत्‍सवात उपेक्षा; सहभागींपर्यंत माहिती न पोहोचल्‍याने मर्यादित उपक्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.