नाशिकमध्ये गोदेची पातळी वाढल्याने व्यावसायिकांत घबराट

Godavari River
Godavari RiverSOMNATH KOKARE
Updated on

पंचवटी (नाशिक) : गंगापूर धरण (Gangapur Dam) समूह क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसानंतर, तसेच धरणात ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा झाल्याने पाटबंधारे खात्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. रात्री पाणी वाढण्याच्या शक्यतेने नदीकाठी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांत भितीचे वातावरण आहे. दरम्यान, विसर्गानंतर दुथडी वाहू लागलेल्या गोदापात्रात (Godavari River) वाहने धुण्यासाठी गर्दी उसळली होती. (Panic among traders due to rising water level of Godavari river)

गत आठवड्यापर्यंत कोरडे ठाक पडलेले व गंगापूर धरणात ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक साठा झाल्याने खबरदारी म्हणून पाटबंधारे खात्याने पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे नदीकाठी टपऱ्यांमध्ये छोटा- मोठा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांत भितीचे वातावरण आहे. मागील पुरासारखेच मध्यरात्री पाणी वाढल्यास मोठे नुकसान होण्याच्या भीतीने हे टपरीधारक व्यावसायिक धास्तावले आहेत. त्यामुळे अनेकांनी पात्रालगतच्या टपऱ्या हलविण्यासाठी लगबग सुरू केली आहे.

Godavari River
नाशिक : धरणातून विसर्गामुळे पाणी कपात मागे, सोमवारी होणार निर्णय

गाड्या धुण्यासाठी लगबग

गेल्या आठवड्यापर्यंत कोरडेठाक असलेल्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने अनेक वाहनधारकांनी गाड्या धुण्यासाठी गंगाघाटावर गर्दी केली होती. यात कारसह रिक्षा व दुचाकीधारकांचा समावेश होता. मागील वर्षी अचानक वाढलेल्या पाण्यात अनेक वाहने अडकून पडली होती. यंदा वाहनधारकांनी पाणी पातळीत वाढ होऊ लागताच लगबग करत तेथील वाहने अन्य ठिकाणी हलविली. मात्र, सायंकाळपर्यंत एक कार पुलालगत तशीच उभी होती.

वाढलेले पाणी पाहण्यासाठी गर्दी

गोदावरीला दरवर्षीच छोटा- मोठा पूर येतो. हा पूर पाहण्यासाठी गाडगे महाराज पुलासह अहिल्यादेवी होळकर पुलावर मोठी गर्दी उकळते. जूनमध्ये, तसेच जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने ओढ दिल्याने यंदा गोदेला पूर येतो की नाही, अशी शंका अनेकांनी व्यक्त केली होती. परंतु, गेल्या पाचसहा दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे धरणसाठ्यात मोठी झाल्याने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यानंतर पाण्याची वाढलेली पातळी पाहण्यासाठी नदीकिनारी गर्दी उसळली होती.

(Panic among traders due to rising water level of Godavari river)

Godavari River
…तर नाशिक, कोपरगावात चिपळूणची पुनरावृत्ती; जलतज्ज्ञ चितळेंच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()