इंदिरानगर (जि. नाशिक) : वडाळा- पाथर्डी रस्त्यावर हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचा गॅस टँकर (Gas Tanker) चालकाचा ताबा सुटल्याने थेट दुभाजकावर (Divider) जाऊन अडकला. सुदैवाने हा टँकर पलटी न झाल्याने मोठी दुर्घटना टळली.
मंगळवारी (ता.१२) राजसारथी सोसायटीजवळ हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा टँकर (एमएच-३१-एफसी- ३७९६) जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने थेट दुभाजकावर चढला. हा टँकर पलटी झाला नाही. (Panic over gas tanker getting stuck in divider Nashik Latest Marathi News)
विशेष म्हणजे अगदी काही क्षण आधीच येथून दोन दुचाकी टँकरला ओव्हरटेक करून पुढे गेले होते, तर समोरच्या बाजूनेदेखील एक ट्रक येत होता. काही महिन्यांपूर्वीदेखील पाथर्डी गावाजवळ असलेल्या चौफुलीजवळ गॅस टँकर थेट उखडून रस्त्याच्या बाजूला पडला होता.
त्या वेळीदेखील वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. आजच्या घटनेमुळेदेखील काही काळ वाहतूक खोळंबली होती. तातडीने क्रेनद्वारे हा टँकर बाजूला करण्यात आला. या रस्त्यावर प्रायोगिक पद्धतीने सुरू केलेली जड वाहनांची वाहतूक आता सर्रास सुरू झाली आहे.
याबाबत माजी नगरसेवक ॲड. श्याम बडोदे तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे रमिझ पठाण यांनी वेळोवेळी वाहतूक शाखेकडे निवेदने दिली आहेत. मात्र, कोणतीही कारवाई अजूनही होत नाही. या भागात मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक राहतात.
रस्त्यावर मोठ्या शाळा आहेत. अनेकदा येथे गंभीर अपघातदेखील झाले आहेत. मात्र, अजूनही जड वाहतूक येथून बंद न केल्याने नागरिकांचा संताप होत आहे. यावर त्वरित मार्ग काढावा अन्यथा येथे जनआंदोलनाला संबंधितांना सामोरे जावे लागेल, असे चित्र सध्या दिसत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.