Nashik Crime News: विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी पालक अन् शाळेच्या प्राचार्यांची एकमेकांविरुद्ध तक्रार

Students with their parents
Students with their parentsesakal
Updated on

नाशिक रोड : जेलरोड परिसरातील नारायण बापूनगर येथील खाजगी शाळेत विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्या प्रकरणी संतापलेला पालकांची शाळेच्या प्रार्चाया विरुध्दात तक्रार तर पालकांनी शाळेत येवून शाळेची नुकसान केल्या प्रकरणी प्राचार्यांची पालकांविरुध्द तक्रार उपनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली. (Parents and school principal complain against each other in case of beating students at scotish academy school Nashik Crime News)

या बाबत माहिती आशीकी नारायण बापूनगर येथील स्कॉटिश अकॅडमी शाळेत इयत्ता आठवी मध्ये शिकणारा पृथ्वीराज अरुण ढिकले दंगा मस्ती करु नका, असे सांगुन प्राचार्या रमा रेड्डी यांनी विद्यार्थ्यांना मस्ती का करतात या कारणाने बेदम मारहाण केली.

तसेच राकेश लकी व समीर कल्याणी यांनाही याच कारणावस्त मारहाण केली. विद्यार्थ्यानी त्वरीत घरी येवून पालकांनी सांगितले. या मारहाणीमध्ये एक विद्यार्थी चक्कर येऊन पडल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

Students with their parents
Pune Crime: घरखर्चास पैसे न दिल्यामुळे पत्नीने केले पतीवर चाकूने वार

पालकांनी विद्यार्थ्यांना का मारले, असा जाब विचारायला गेलेल्या पालकांना सुद्धा काठीने मारहाण केली याबाबात व्हिडिओ व्हायरल झाला आहे. संतापलेल्या पालकांनी कैलास ढिकेल आदि पालकांनी उपनगर पोलीस ठाण्यात शाळेच्या संचालिका रमा रेड्डी यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे.

पालकांनी शाळेत येवून साहित्याची नुकसान केली आहे. याबाबत स्कॉटिच अकॅडमी शाळेच्या प्राचार्य रमा रेड्डी व तेथील शिक्षिका यांनी पोलीस ठाण्यात येवून तक्रार केली. यावेळी पालक व शिक्षकांची शाब्दिक चकमक झाली.

Students with their parents
Nashik Crime News : चोरट्यांचा मोर्चा वीज पंपांकडे; सुरगाणा तालुक्यात शेतकऱ्यांची वाढतेय डोकेदुखी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.