Nashik : प्रॉपर्टी वादातून माथेफिरु मुलाने आई वडीलांना पाठविले यमसदनी

criminal Arrested
criminal Arrestedesakal
Updated on

लासलगांव (जि. नाशिक) : निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथे प्रॉपर्टी व्यवहाराच्या वादातून भांडणातून माथेफिरू मुलाच्या मारहाणीत आईवडिलांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वडील रामदास अण्णाजी सुडके, आई सरूबाई रामदास सुडके असे मयत आई वडिलांची नावे आहे. (Parents killed in property dispute by son at Khadak Malegaon Nashik crime News)

पोलिसांनी सुत्रांनी दिलेली माहिती अशी की... निफाड तालुक्यातील लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले खडक माळेगाव येथील सुडके वस्तीवर राहणारे रामदास अण्णाजी सुडके हे आपली पत्नी सरूबाई, मुलगा दत्तात्रय व नात असा परिवार राहत होता घरातील आणि शेतीचे संपूर्ण व्यवहार आई सरूबाई हिच्या हातात असल्याने नेहमीच आई व मुलात वाद होत होते. आज सकाळी नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान आई वडील आणि मुलगा यांच्यात हा वाद इतका विकोपाला गेला की माथेफिरू मुलगा दत्तात्रेयाने लोखंडी पाईपने आई सरूबाई आणि वडील रामदास यांना मारहाण केली आरडाओरड झाल्यामुळे शेजारील वस्तीवरील धावपळ करत आले यावेळी बघितले असता या मारहाणीत डोक्याला गंभीर जखम झाल्याने तातडीने दोघांना निफाड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता मयत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले यावेळी माथेफिरू मुलगा दत्तात्रेय हा शेतीच्या कडेने पळून जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात येतात त्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करत या माथेफिरू याला ताब्यात घेतले असून याची कसून चौकशी केली असता प्रॉपर्टीच्या व्यवहाराच्या भांडणातून मारहाण केल्याची कबुली त्याने दिली आहे. या गुन्ह्यातील आरोपी दत्तात्रेय याचे दोन लग्न झाले असून पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर परभणी येथील दुसरी पत्नी त्याने केली मात्र नेहमीच वादविवाद होत असत आल्याने गेल्या दोन महिन्यांपासून दुसरी पत्नीही माहेरी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे अंदाजे चार वर्षाच्या मुलीला सोडून निघून केल्याची माहिती समोर आली आहे.

criminal Arrested
धोकादायक घर, वाड्यांचे नळजोडणी तोडण्याच्या मनपा आयुक्तांच्या सूचना

याप्रकरणी नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, निफाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ तपास करत आहे यातपोलिस उपनिरीक्षक आदिनाथ कोठले ,पो. कॉ. योगेश शिंदे, प्रदीप अजगे, कैलास महाजन , मारुति सुरासे, सागर आरोटे, सुजय बारगळ, देवीदास पानसरे यांची मदत मिळाली.

criminal Arrested
वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून घंटागाडी कर्मचाऱ्याने घेतला गळफास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()