Nashik News: भाऊबहिणीने दाखविलेल्या धाडसाने वाचले आई वडिलांचे प्राण! शाळेकडून मिळाली कौतुकाची थाप

Appreciating the bravery of Mansi Ghorpade and Chetan Ghorpade studying in Lohoner Janata Vidyalaya, Principal Y. U. Bairagi, Supervisor B. S. Vacant and present teachers.
Appreciating the bravery of Mansi Ghorpade and Chetan Ghorpade studying in Lohoner Janata Vidyalaya, Principal Y. U. Bairagi, Supervisor B. S. Vacant and present teachers.esakal
Updated on

Nashik News : लोहोणेर येथील जनता विद्यालयात इयत्ता दहावीत शिकणारी विद्यार्थिनी मानसी घोरपडे व इयत्ता आठवीत शिकणारा भाऊ चेतन घोरपडे यांनी विद्युत प्रवाह उतरलेल्या तारेला चीपकलेल्या आई वडिलांना धाडसाने व शौर्याने वाचवत प्राण वाचविले.

त्यांच्या धाडसाबद्दल शाळेने कौतुक करत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. (Parents lives saved from electricity by courage shown by ghorpade brother and sister Appreciation received from school at lohoner Nashik News)

दोन दिवसांपूर्वी लोहनेर येथील मानसी घोरपडे त्याची आई दिपाली घोरपडे आपल्या राहत्या घरी सकाळी घरासमोर असणाऱ्या तारेवर टाकलेले कपडे काढण्यासाठी गेल्या असता कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेल्या तारेचा विजेच्या तारेला स्पर्श होवून या तारेतून विद्युत प्रवाह सुरू होता.

बेसावधपने तारेला हात लाऊनच कपडे काढल्यामुळे त्या तारेला चिपकल्या यावेळी त्यांनी मदतीसाठी मोठ्याने आरडाओरड केला. घरात असलेले त्यांचे पती शांताराम घोरपडे यांनी हा आवाज ऐकताच आपल्या पत्नीला वाचविण्यासाठी धाव घेतली.

त्यांनी पत्नीला हात लाऊन बाजूला करत असतांना त्यांना देखील विजेचा शॉक लागला व ते देखील त्या तारेला चीपकले.

यावेळी आई का ओरडत आहे हे पाहण्यासाठी मुलगी मानसी व मुलगा चेतन गेले असता.आई व वडील हे दोघेही त्या लोखंडी तारीला चिकटलेले दिसले. यावेळी मुलगा चेतन घोरपडे याने मोठया धैर्याने व प्रसंगावधान दाखवत विद्युत प्रवाहाचा स्विच बंद करत विद्युत प्रवाह खंडित केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Appreciating the bravery of Mansi Ghorpade and Chetan Ghorpade studying in Lohoner Janata Vidyalaya, Principal Y. U. Bairagi, Supervisor B. S. Vacant and present teachers.
Success Story : अडथळ्यांची शर्यत पार करून अंकुश यशस्‍वी! कुटुंबाची जबाबदारी सांभाळत सुरू ठेवला अभ्यास..

तर बहीण मानसी हिने घराचा मुख्यदरवाजा उघडून लोकांना जमा केले. यावेळी शेजारी मदतीसाठी तात्काळ धावले. त्यांनी दोघांना तारेपासून बाजूला करत लागलीच दवाखान्यात नेले.

लवकर विद्युत प्रवाह बंद केल्याने व लागलीच वैद्यकीय मदत घेतल्याने दोघाही पतीपत्नीचे जीव वाचवल्याने भाऊ बहिणीने दाखविलेल्या प्रसंगावधान व धाडसाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक झाले.

विद्यालयाच्या वतीने मानसी व चेतन यांच्या धाडसाबद्दल व शौर्याबद्दल मुख्याध्यापक वाय. यु. बैरागी, पर्यवेक्षक बी. एस. निकम आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक वृंदांनी त्यांचे कौतुक केले.

यावेळी मुलगी मानसी घोरपडे हिने घडलेला घटनाक्रम सांगताना अश्रू अनावर झाले. तसेच आईशी फोनवर संपर्क केला असता आमच्या मुलांमुळे आमचा जीव वाचला असे त्यांनी मुलांचा गौरोदगार करत सांगितले.

Appreciating the bravery of Mansi Ghorpade and Chetan Ghorpade studying in Lohoner Janata Vidyalaya, Principal Y. U. Bairagi, Supervisor B. S. Vacant and present teachers.
Business Success Story: काच कापण्याचं काम करणाऱ्या मुलीने उभारला ४० हजार कोटींचा व्यवसाय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()