NMC News: काम पूर्ण होण्याअगोदरच काँक्रिट रस्त्याची लागली वाट!

Former corporator Salim Shaikh inspecting the newly constructed road.
Road Construction
Road Constructionesakal
Updated on

NMC News : सुमारे दोन वर्षापासून सुरू असलेल्या अर्धवट पूर्ण झालेला काँक्रीटचा रस्ता उखडू लागल्याने मनपाच्या निकृष्ट कामाचे पितळ उघडे पडले आहे.

दरम्यान, अर्धवट सुरू असलेला हा रस्ता सध्या अपघाताला निमंत्रण ठरत असल्याने माजी नगरसेवकांसह सर्वसामान्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

प्रभाग ११ मधील माजी नगरसेवक सलीम शेख, योगेश शेवरे व प्रभाग १० च्या माजी नगरसेविका पल्लवी पाटील यांनी एकत्र येत दोन वर्षापूर्वी अर्थात रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामासाठी प्रत्येकी सव्वा कोटी याप्रमाणे पावणेचार कोटी रुपयाचा नगरसेवक निधी देत कामाचे श्रीफळ वाढवले होते. (partially completed concrete road in progress for 2 years started crumbling exposing NMC government work quality nashik)

दरम्यान, ठेकेदाराकडून रस्ता खोद काम करत प्रत्यक्षात काँक्रिट करण्याच्या कामाला उशिरा प्रारंभ केला. त्यामुळे नागरिकांसह व्यापारी वर्गात प्रचंड नाराजी व्यक्त होत होती. सलीम शेख यांनी पाठपुरावा करत कामात गती आणली.

अखेर वर्षभरापूर्वी अर्ध्या रस्त्याचे काम पूर्ण करत रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तर पुढील अर्ध्या रस्त्याचे काम संथ गतीने सुरु आहे. दरम्यान, वाहतुकीस सुरु केलेल्या रस्त्यांची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी रस्ता उखडला आहे.

दरम्यान, संथगतीने सुरू असलेले रस्त्याच्या कामामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. श्रमिकनगर परिसरातील युवकाचा सोमवारी सायंकाळी याच रस्त्यावर अपघात झाला. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Road Construction
NMC News: बेकायदेशीर फलकांवर गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी विभागांवर

ठेकेदाराने कामाच्या ठिकाणी कुठली सूचना न लावल्याने वाहनधारकांची दिशाभूल होत अपघाताला सामोरे जावे लागत आहे.

"प्रत्यक्षात १२ मिटर असलेल्या रस्त्याचे केवळ ८ मिटर रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. त्यातही निकृष्ट दर्जाचे काम झाले असून ठिकठिकाणी रस्त्याला तडे जात आहे. निकृष्ट दर्जाच्या कामाचे बिल अदा झाल्यास जनआंदोलन करणार. आयुक्तांनी स्वतः पाहणी करत ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करावे."- सलीम शेख, माजी नगरसेवक

"कामाची मुदत संपल्यानंतर वाढीव मुदत घेऊनही अद्याप काम पूर्ण होत नाही. दोन वर्षांपासून स्थानिक नागरिकांना वेठीस धरले जात असून व्यवसायिकांना नाहक आर्थिक भुर्दंड बसत आहे. ठेकेदाराचे बिल अदा झाल्यास जण आंदोलन करू." - पल्लवी पाटील, माजी नगरसेविका

Road Construction
ZP Home Visit Campaign: जिल्ह्यातील मॉडेल गावांमध्ये गृहभेट अभियान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.