Nashik: अभीष्टचिंतनाच्या निमित्ताने खुंटा अधिक बळकट! आमदार नितीन पवारांनी मुत्सदीपणा दाखवत आणला कोट्यवधींचा विकासनिधी

Vast crowd attended Ajit Pawar's meeting
Vast crowd attended Ajit Pawar's meetingesakal
Updated on

रवींद्र पगार : सकाळ वृत्तसेवा

कळवण : राज्यातील बदलत्या राजकीय स्थित्यंतरात स्वतःच्या मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी त्या संधीचा नेमका कसा आणि कधी फायदा घ्यायचा याची परिपक्वता दाखवण्यात आमदार नितीन पवार 'परफेक्ट' निघाल्याचे शनिवार (ता.७) च्या त्यांनी आयोजित केलेल्या 'इव्हेंट'ने अधोरेखित केले आहे. (party stronger on occasion of aspiration MLA Nitin Pawar showed diplomacy and brought development fund worth crores Nashik)

‌‌‌‌‌‌‌‌‌‌

कळवणचे माजी आदिवासी मंत्री ए. टी. पवार यांनी विकासकामांबाबत पाणी, आरोग्य, सिंचन व्यवस्था, शिक्षण आदी क्षेत्रात भरीव काम केले आहे. विकासकामे करून घेण्याची त्यांची हातोटी वेगळी होती.

त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आमदार नितीन पवार यांनी तब्बल तीन ते चार वेळा उपमुख्यमंत्री अजित पवारांबरोबर जयंत पाटील यांनाही मतदारसंघात आणून चार वर्षांत ११०९ कोटींचा भरीव निधी आणला. मागील पंचवार्षिक निवडणुकीतील अनुशेष भरून काढण्यात ते यशस्वी झाले.

संभाव्य लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधीच अचूक टायमिंग साधत आमदार पवार यांनी आपल्या वाढदिवशी राज्याच्या खजिन्याच्या चाव्या असलेल्या दादांकडून थेट कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे गिफ्ट पदरात पाडून घेत मतदारसंघातील आपल्या विरोधकांना आपल्या कार्यकतृत्वाचा आवाका दाखवून दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यावर नितीन पवार द्विधा मनस्थितीत न राहता बिनशर्त अजित पवार यांना पाठिंबा देऊन राजकीय मुत्सद्दीपणा दाखवला.

मतदारसंघातील विकास कामांसाठी भरघोस निधी मिळवून घेतानाच कळवण-सुरगाणा या दोन्ही तालुक्यातील (कळवण तालुक्यातील एक गट सोडून ) राष्ट्रवादी काँग्रेस सुध्दा आपल्या सोबत अर्थात अजित पवारांच्या बाजूने ठेवण्यात नितीन पवार यशस्वी ठरले आहेत.

Vast crowd attended Ajit Pawar's meeting
Nashik: नांदगाव, मनमाडचे सेतू केंद्र ठप्प! दलालांचा वावर संपणार कधी? नागरिकांसह विद्यार्थ्यांचे दाखल्यांसाठी हाल

शनिवारच्या विराट सभेने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. आमदार पवारांनी सुरवातीपासूनच अजित पवारांना साथ दिली. याची वाच्यता त्यांनी शनिवारच्या सभेत उघडपणे केली.

आमदार अजित पवारांसोबत आहेत, म्हटल्यावर कळवण-सुरगाणा तालुक्यातील तळ्यात मळ्यात असलेले सर्व विनासायास नितीन पवारांसोबत आले.

अवघ्या एक वर्षावर येऊन ठपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी लांब गेलेले नेते व कार्यकर्त्यांना तरूण कार्यकर्त्यांना सोबत कसे घेता येईल यासाठी आमदार पवारांनी वेगळी व्युहरचना करुन सगळ्यांना सोबत घेऊन आगामी काळात वाटचाल केली पाहिजे.

मतदारसंघातील प्रलंबित कामे, ओतूर सारखे रखडलेले प्रकल्प, कांदा उत्पादकांच्या व्यथा आणि या सोबतच कसमादेच कार्यक्षेत्र असलेल्या वजनदार मालकाच्या प्रतीक्षेत असलेल्या वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचा विषय,

आदिवासी बहुल भागातील जिल्हा परिषद शाळा इमारतींची वाईट झालेली अवस्था, नाशिक दिंडोरी कळवण रस्ता चौपदरी व्हावा, सुरगाणा तालुक्यात सिंचन प्रकल्पाना मंजुरी द्यावी,

अर्जुनसागर परिसरात दिवंगत एटी पवार यांच्या स्मारकास मजुरी देऊन पर्यटन विकास करावा आदी प्रमुख प्रश्न मार्गी लागतील अशी आशा आता जनतेत निर्माण झाली आहे.

Vast crowd attended Ajit Pawar's meeting
Inspirational Story: खुंटेवाडीच्या लहानग्या दूर्वाची द. आफ्रिकेत क्रिकेटमध्ये भरारी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.