Nashik News : प्रवासी गाडी, एसटी बसचा लासलगाव फाटा येथे अपघात

Accidental cars on Chandwad-Lasalgaon junction here.
Accidental cars on Chandwad-Lasalgaon junction here.esakal
Updated on

मनमाड (जि. नाशिक) : येथील मनमाड-चांदवड रोड येथील लासलगाव फाटा येथे अनेक दिवसांपासून अपघात होत असून, हा फाटा अपघात क्षेत्र बनला असून, अपघाताचे प्रमाण वाढले आहे. आज प्रवासी गाडी आणि एसटी बसचा अपघात झाला. (Passenger car ST bus accident at Lasalgaon Phata Nashik News)

मनमाड-चांदवड रस्त्याचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून, रस्ता चांगल्या प्रतीचा झाल्यामुळे या रस्त्यावर वाहनांची संख्या आणि वाहनांचा वेग वाढल्यामुळे अपघातांचे प्रमाणदेखील वाढले आहे.

याच रस्त्यावर मनमाड जवळच असलेल्या लासलगाव फाटा परिसरात चार दिशांचे रस्ते एकत्र येत असल्यामुळे येथे अनेकदा वाहनांच्या जास्त वेगमर्यादेमुळे अनेक अपघात घडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात छोट्या-मोठ्या अपघातांची मालिका सुरू आहे.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Accidental cars on Chandwad-Lasalgaon junction here.
Nashik News : नांदगावला अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी!

लासलगाव फाटा परिसरात अनेकदा वाहनचालकांना आपल्या योग्य दिशेने जाण्यासाठी आवश्यक असे दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नसल्याने वाहनचालकांची यामुळे गैरसोय होत आहे. अनेकदा या ठिकाणी बेशिस्त वाहनचालकांमुळे अनेक अपघात घडत आहे.

या परिसरात दिशादर्शक फलक लावण्यात यावे, वेग मर्यादेसाठी गतिरोधक टाकण्यात यावे, मर्यादित स्पीड लिमिटचे फलक लावण्यात यावे, वाहतूक पोलिसांची येथे नियुक्ती करण्यात यावी जेणेकरून वाहनांची वेग मर्यादा या ठिकाणी कमी प्रमाणात होऊन अपघातांचे प्रमाण कमी करता येईल, अशी मागणी प्रवास करणारे प्रवासी आणि वाह चालकांच्या वतीने करण्यात येत आहे.

Accidental cars on Chandwad-Lasalgaon junction here.
Nashik News : मालेगावच्या पूर्व भागात स्वच्छतेचा उडाला बोजवारा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()