घोटी (जि. नाशिक) : मुंबई-नाशिक महामार्गावर रविवारी (ता. २७) सायंकाळी पाचपासून सातपर्यंत सिन्नर फाटा ते दोन किलोमीटर नाशिककडील संपूर्ण वाहतूकव्यवस्था कोलमडली होती. शनिवार, रविवार या दोनदिवसीय पर्यटनासाठी व सुटीत कुटुंबीयांसमवेत आपल्या नातेवाइकांकडे जाणाऱ्या अनेक वाहनचालकांसह कुटुंबीयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. (Passengers and drivers shocked by traffic jam on Mumbai Nashik highway route nashik news)
हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??
गेल्या वर्षभरापासून घोटी न्हाईडी डोंगर ते खंबाळे पुलापर्यंत २.७ किलोमीटर जंक्शन उड्डाणपुलाचे कामकाज युद्धपातळीवर सुरू आहे. त्यातच दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोडवर खाचखळगे व कामाची गती कमी असल्याने महामार्गावर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूकव्यवस्था कोलमडून तासनतास वाहनचालक व प्रवाशांचा जीव दावणीला टांगला जात आहे.
राष्ट्रीय महामार्गाने मुंबई-नाशिक मार्गावरील सिन्नर फाटा या परिसरास ब्लॅक स्पॉट घोषित केल्याने या ठिकाणी खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठपुराव्याने जंक्शन उड्डाणपुलाचे कामकाज सुरू झाले. मात्र धिम्या गतीने सुरू असलेल्या कामाने परिसरातील व्यावसायिक, कामगार, विद्यार्थी, रुग्णवाहिका या दोन दिवसांत ये-जा करताना अनेकदा वाहनचालकांत वाहन-मागे पुढे घेण्यावरून हाणामारीच्या घटना अनेकदा घडल्याचे दिसून येते. जंक्शन उड्डाणपुलाचे काम जलद गतीने पूर्ण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
"गेल्या वर्षभरात या वाहतूक कोंडीमुळे अनेकदा महामार्गावर अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला. दर दिवसाकाठी रस्ता वेगळ्या मार्गाने नेला जातो. पुलाचे कामकाज जलदगतीने करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रित करावे."
- विशाल पिचा, सामाजिक कार्यकर्ते
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.