नाशिकरोड : नाशिककरांची प्रवासवाहिनी असणाऱ्या पंचवटीतील दोन डब्यातील दिवे दोन दिवस बंद होते. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. रात्री मुंबईहून नाशिकला येताना दोन बोग्यांमधील प्रवाशांना अंधारात प्रवास करावा लागला. म्हणूनच प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. (Passengers travel in darkness in Panchavati Express Nashik News)
शनिवारी (ता. ७) पंचवटी मुंबईहून सहा वाजता नाशिकला निघाली तेव्हा काही दिवे चालू तर काही बंद होते. डी ७ आणि डी ८ हे पासधारकांचे कोच आहेत. गाडी सुटल्यापासून ठाकुर्ली येईपर्यंत दिवे बंद होते. कसारा घाट (Kasara Ghat) येईपर्यंत दिवे लागले नव्हते. प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर काम सुरू झाले आणि दिवे लागले. सोमवारी (ता. ९) पुन्हा याच दोन कोचमध्ये असाच प्रकार घडला. दिवा ते टिटवाळापर्यंत दिवे लागत नव्हते. तक्रारीनंतर दिवे सुरू झाले. पंचवटी आणि जालन्याची जनशताब्दीसाठी एकच गाडी वापरला जातो. शनिवारी जालन्याहून जनशताब्दी (Janshatabdi express) ही गाडी मनमाडला रात्री आली. रविवारी (ता. ८) मनमाडहून पंचवटी म्हणून ती मुंबईला गेली. तेथून रविवारी जालन्याला जनशताब्दी म्हणून गेली. सोमवारी (ता. ९) जालन्यावरून जनशताब्दी म्हणून मुंबईला आली.
सोमवारी रात्री पंचवटी म्हणून मुंबईहून निघाली तेव्हा पुन्हा या दोन कोचमधील दिवे बंद झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन डब्याला जोडणारी विजेची वायर चोरीला गेली. म्हणून अंधारात प्रवास करावा लागला. गाडीची देखभाल होत नाही. दोन दिवस मिळूनही काम केले नाही. अंधारात चोरी किंवा अन्य घटना घडली तर जबाबदार कोणाला धरायचे. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.