Nashik News: महागाईच्या काळात मालेगावला अल्पदरात रुग्णसेवा! गरीब, कामागार वर्गाकडून सर्वाधिक लाभ

Hospital
Hospitalsakaal
Updated on

मालेगाव : शहरात गल्ली, मोहल्यात मोठ्या प्रमाणात लहान-मोठी दवाखाने आहेत. महागाईच्या काळातही मोहल्ला क्लिनिकच्या माध्यमातून युनानी औषध उपचार करीत रुग्णांना अल्पदरात सेवा देण्याचे काम येथील डॉक्टर करीत आहे.

अवघ्या वीस रुपयात रुग्णांची तपासणी व त्याला दोन दिवसांची गोळ्या-औषधेही देण्यात येतात. त्यामुळे शहरातील गरीब, कामगार वर्गासाठी ही रुग्णालये वरदान ठरली आहेत. (Patient care at low rates in Malegaon during inflation poor working class benefit the most Nashik News)

शहरात यंत्रमाग, प्लास्टिक वेचणारे, भंगार, तरासन यासह विविध घटकातील मजुर वर्ग येथे राहतात. येथे दारिद्र्यरेषा व झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

शहरातील या वर्गाला स्वस्तात साथीचे आजारापासून अल्पदरात उपचार व्हावे म्हणून मोठ्या संख्येने युनानी डॉक्टर रुग्णसेवा देतात.

त्यामुळे याही उपचार पद्धतीने शहराची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अल्प दरात सेवा देणारे डॉक्टर शहरातील रूग्णांची लाईफलाइन बनले आहे.

१९८१ मध्ये मन्सुरा युनानी महाविद्यालयाची सुरुवात झाली होती. या महाविद्यालयातून शहरातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी युनानीचे वैद्यकीय शिक्षण घेतात.

येथे युनानी व इतर आठशे डॉक्टर आहेत. त्यापैकी सुमारे ६०० डॉक्टरांचे शहरातील विविध भागात दवाखाने आहेत. प्रामुख्याने येथील डॉक्टर ताप, सर्दी, खोकला, डायरिया, चिकनगुणिया, न्युमोनिया, खाज यासह विविध आजारांवर उपचार करतात.

Hospital
Dr. Bharati Pawar News: निफाड ड्रायपोर्टसाठी 108 कोटींचा पहिला हप्ता जमा! मंत्री डॉ. पवार

मालेगाव शहराबाहेर रुग्ण तपासणीची फी ५० ते १०० रुपये आहे. शहरात आजही येथील डॉक्टर २० ते ३० रुपयात इंजेक्शन व सोबत तीन वेळच्या गोळ्या देतात. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील रुग्णही शहरात येतात.

महागाईतही अल्प शुल्कात सेवा देण्याचे काम येथील डॉक्टर अविरतपणे करीत आहेत. साथीच्या आजाराच्या वेळी रुग्णांना यातून मोठा दिलासा मिळतो. शहरात चिकनगुणिया यासह कोरोना काळात येथील डॉक्टरांनी ठामपणे रुग्णांची मदत केली.

कोरोनामध्ये शहर राज्यात हॉटस्पॉट ठरले होते. त्यावेळी येथील काढा व युनानी डॉक्टरांची उपचाराने महत्त्वाची भूमिका बजावली. साथीचे आजारांवर कमी किमतीत चांगले उपचार देण्याचे काम येथील डॉक्टर करतात.

"शहरात गरीब व मजूर वर्गाची संख्या जास्त आहे. त्यामुळे तपासणी फी वाढवता येत नाही. कमी खर्चात जास्त रुग्णांची तपासणी येथील डॉक्टर करतात. सध्या डॉक्टर ३० रुपये घेतात. सेवाभाव या हेतूने डॉक्टर वैद्यकीय सेवा अल्प दरात देतात."

- डॉ. रिहान अहमद, मालेगाव युनानी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक

Hospital
Deepak Kesarkar: कोणत्याही परिस्थितीत शाळांचे खाजगीकरण नाही; शिक्षणमंत्री दीपक केसरकरांचे शिक्षक संघटनेला आश्वासन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.