Nashik: प्रशिक्षणार्थी डॉक्टरने मृत घोषित केलेला रुग्ण निघाला जिवंत! Civilच्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार

civil hospital
civil hospitalesakal
Updated on

Nashik News : गंभीररित्या भाजलेल्या रुग्णावर जिल्हा रुग्णालयाच्या जळीत वॉर्डमध्ये उपचार सुरू असताना गुरुवारी (ता. २५) सकाळी वैदयकीय महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरने मयत घोषित केले.

मात्र अवघ्या दीड तासांनी तोच रुग्ण जीवंत असल्याचे समोर आल्यानंतर संतप्त झालेल्या नातलगांनी गोंधळ घातला. या घटनेमुळे प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या भरवशावर सुरू असलेली जिल्हा रुग्णालयातील संवेदनशील रुग्णसेवा चालते की काय, असा प्रश्‍न उभा राहिला आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने ‘दैवी चमत्कार’ (मिरॅकल) म्हणून वैद्यकीय अधिकाऱ्यांची पाठराखण केली असली तरी काही गंभीर मुद्दे या घटनेमुळे समोर आले असून त्याकडे वेळीच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होते आहे. (patient declared dead by trainee doctor turns out to alive case in Civil Medical College Nashik news)

नितीन सुरेश मोरे (४१, रा. मोरे वाडा, अशोकस्तंभ) यांनी गेल्या सोमवारी (ता.२२) दुपारी स्वत:च्या दुकानात अंगावर पेट्रोल ओतून घेत पेटवून घेतले होते. त्यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वैदयकीय महाविद्यालयाच्या अधिकारकक्षेतील जळीत वॉर्डमध्ये दाखल केले.

मोरे हे यात ९३ टक्के भाजले आहेत. त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान, गुरुवारी (ता. २५) सकाळी साडेसहाच्या सुमारास मोरे याची कोणतीही हालचाल होत नसल्याने वॉर्डमधील उपस्थित प्रशिक्षणार्थी डॉ. श्‍वेता नलवाडे यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर इसीजी घेतला.

इसीजीचा रिपोर्ट फ्लॅट (सरळ रेष) आल्याने त्यांनी नातेवाईकांना लगेचच मोरे मयत झाल्याचे सांगितले. त्यावेळी मोरे यांच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगरच कोसळला. त्यानंतर नातलगांनी रुग्णालयाच्या प्रक्रियेनुसार सिव्हिल पोलीस चौकीत रुग्ण मयत झाल्याची माहिती दिली. त्यानुसार पंचनाम्याची प्रक्रियाही सुरू झाली.

दरम्यान, आठ वाजेच्या सुमारास वॉर्डमध्ये उपस्थित एका प्रशिक्षणार्थी वैद्यकीय अधिकाऱ्यास मयत मोरे यांच्या पायांची मंद हालचाल होत असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ इसीजी रिपोर्ट घेतला असता रुग्णाच्या हृदयाचे ठोके आले.

त्यानंतर त्यांनी तात्काळ वैद्यकीय उपचार सुरू केले. मयत मोरे जिवंत असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आल्यानंतर मात्र नातलगांची संताप अनावर झाला. त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह वॉर्डातील नर्स, कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.

वातावरणात तणाव निर्माण झाला. वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जळीत वॉर्डकडे धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. पोलीसांचा पाचारण करण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

civil hospital
Ashish Vidyarthi Wedding: कोण आहे रुपाली बरुआ?.. जिच्याशी वयाच्या ६० व्या वर्षी आशिष विद्यार्थींनी बांधली लग्नगाठ..

प्रशिक्षणार्थींवर किती भरवसा ठेवायचा?

जळीत रुग्ण मोरे यांना मयत घोषित करण्यात आल्याच्या घटनेवरून अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत. प्रशिक्षणार्थी डॉक्टरने मोरे यांना मयत घोषित करण्यापूर्वी कोण-कोणत्या तपासण्या केल्या? वॉर्डातील परिचारिका काय करीत होत्या?

मोरे यांना मयत घोषित करण्यापूर्वी प्रशिक्षणार्थी डॉक्टरने वॉर्डातील वरिष्ठ डॉक्टरांना माहिती दिली होती का? प्रशिक्षणार्थी डॉक्टरच जर अंतिम निर्णय घेत असतील तर वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरजच काय? केवळ इसीजी फ्लॅट (सरळ रेष) आल्याने रुग्ण मयत झाला तर, परत तो जिवंत कसा झाला?

वैद्यकीय महाविद्यालयाच्या म्हणण्यानुसार ‘मिरॅकल’ असेल तर प्रत्येक रुग्ण ‘मिरॅकली’ जिवंत होऊ शकतो का? मूळात, मोरे व्हेटिंलेटरवर असताना, वेळोवेळी रुग्णाचा बीपी (रक्तदाब) मोजला जात असतो, त्यावरून रुग्णांच्या प्रकृतीची स्थिती कळत असते.

अचानक इसीजी फ्लॅट कसा येऊ शकतो? अथवा इसीजी मशिन नादुरुस्त असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

या व असे अनेक प्रश्‍न यानिमित्ताने समोर येत असून, सिव्हिलच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावाखाली जी प्रशिक्षणार्थींची भाऊगर्दी गोळा झाली आहे, याला कुठेतरी पायबंद घालण्याची नितांत आवश्‍यकता आहे. याबाबत कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

"गंभीररित्या भाजलेल्या रुग्णावर उपचार करणे अत्यंत जिकिरीचे असते. एकाचवेळी अनेक समस्या निर्माण होत असतात. मोरे यांच्याबाबतीत हृदयाची क्रिया थांबण्याचे प्रकार सकाळी दोन वेळा घडली. मात्र औषधोपचारानंतर आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. वैद्यकीय पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत." - डॉ. अरुण पवार, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक.

civil hospital
Tamil Nadu Sengol : मोदींना 'असं' सापडलं सेंगोल! नेहरुंची चालण्याची काठी की सामर्थ्याचं प्रतिक?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.