नाशिक : एसएमबीटी रुग्णालयात दोन्ही पायाच्या खुब्यांवर यशस्वी सांधेरोपण झाले. रुग्ण आता हालचाली करु लागला आहे. नेहमीप्रमाणे चालतो आहे. या रुग्णाने शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना अनोखे गिफ्ट दिले आहे. त्यांचे रेखाटलेले हुबेहुब चित्र त्यांना दिले. भुसावळ (जि.जळगाव) येथील मूळ रहिवाशी संदीप मुरलीधर बोधडे असे त्या रुग्णांचे नाव आहे, तर यशस्वी उपचार करणारे डॉक्टर आहेत, मनोज काशिद. (patient gave Surprise sketch to doctor at SMBT hospital Nashik News)
श्री. बोधडे हे मनमाडमध्ये आहेत. ते ‘टॅटू आर्टीस्ट' आहेत. मित्राने त्यांना एसएमबीटी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. तेथे सांधेरोपण व अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. मनोज काशिद यांनी रुग्णालयात दाखल करून घेत शस्त्रक्रिया केल्या. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत इलाज झाल्याने श्री. बोधले यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले नाही.
श्री. बोधले यांनी डॉ. काशिद यांचे वेगळ्या पद्धतीने आभार मानण्याचे ठरवले. त्यांनी डॉक्टरांचे छायाचित्र सोशल मीडियातून मिळवले. कुणाला न सांगता छायाचित्रावरुन रेखाचित्राचे रेखाटन त्यांनी केले. शस्त्रक्रियेनंतर चार दिवसांनी डॉ. काशिद भेटण्यासाठी आले असताना श्री. बोधले यांनी त्यांना रेखाचित्र भेट दिले. डॉ. काशिद यांचे रेखाचित्र हुबेहुब असल्याने उपस्थित डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला.
दीड वर्षात ४३२ शस्त्रक्रियाहेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?
एसएमबीटीमध्ये गेल्या दीड वर्षांत ४३२ रुग्णांवर यशस्वी सांधेरोपण शस्रक्रिया (गुडघे व खुबा प्रत्यारोपण) करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रसह ठाणे, पालघरमधील विविध आरोग्य शिबिरातील रुग्णांचा त्यात समावेश आहे. रुग्णालयात १ हजार खाटांचा आंतररुग्ण विभाग आहे. आयसीयूच्या १०० खाटा आहेत. १३ मॉड्यूलर शस्त्रक्रिया कक्ष, अत्याधुनिक कॅथलॅब, १० एनआयसीसू आणि पीआयसीयू खाटा, २४ तास डायलिसीस, २४ तास औषधालय, रुग्णांसाठी मोफत भोजन, नातेवाईकांसाठी निवास व भोजन, २४ तास रुग्णवाहिका, २४ तास खुली रक्तपेढी अशा सुविधा आहेत.
"रूग्णाचे वय कमी होते, त्याला चालताना पाह्यचे होते. टप्प्याटप्प्याने आम्ही शस्त्रक्रिया केल्या. रुग्णाने माझे आणि पत्नीचे हुबेहूब चित्र रेखाटल्याचे पाहून मी भारावून गेलो. डॉक्टरांच्या प्रती असलेले प्रेम त्यातून व्यक्त झाले."
-डॉ. मनोज काशिद (सांधेरोपण व अस्थीरोग तज्ज्ञ)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.