Nashik News: नुकसानभरपाई 8 दिवसांत द्या : आमदार कोकाटे यांचा MSRDC ला अल्टिमेटम

Farmers presenting their grievances in front of MLA Manikrao Kokate and Tehsildar Abhijit Baravkar in Tehsildar office.
Farmers presenting their grievances in front of MLA Manikrao Kokate and Tehsildar Abhijit Baravkar in Tehsildar office.esakal
Updated on

सर्वतीर्थ टाकेद : धामणी परिसरातील समृद्धी महामार्गाच्या ब्लॅस्टिंगच्या कामामुळे अनेक घरांवर दगड उडाले होते. या घटनेत नऊवर्षीय बालिका बचावली होती. यांसह अनेक घरांना तडेही गेले होते.

त्या अनुषंगाने आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांनी समृद्धी महामार्गाचे अधिकारी, ठेकेदार आणि नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांची बैठक इगतपुरी तहसील कार्यालयात घेतली. नुकसानग्रस्तांना आठ दिवसांच्या आत भरपाई देण्याचे आदेश त्यांनी दिले.

तज्ज्ञ समिती नेमून आणि इगतपुरी तालुका प्रशासनाच्या देखरेखेखाली ब्लॅस्टिंग करण्याच्या सूचना श्री. कोकाटे यांनी दिल्या. बैठकीस धामणी, पिंपळगाव मोर, धामणगाव, गंभीरवाडी, तातळेवाडी, टाकेद परिसरातील शेतकरी उपस्थित होते. (Pay compensation in 8 days MLA Kokates ultimatum to MSRDC Nashik News)

Farmers presenting their grievances in front of MLA Manikrao Kokate and Tehsildar Abhijit Baravkar in Tehsildar office.
Nashik News: तेव्हा गळ्यात कांदामाळ घालणारे, आत्ताचे लोकप्रतिनिधी गेले कुठे? माजी खासदार चव्हाण यांचा प्रश्न

शेतकऱ्यांनी आमदार कोकाटे यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला. क्रॉसिंग, पाइपलाइन, वीजतारा, सर्व्हिस रोड हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तत्काळ नियोजन करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इशारा आमदार कोकाटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

तहसीलदार अभिजित बारवकर, समृद्धी महार्गाचे अधिकारी सातपुते, घोटीचे पोलिस निरीक्षक पाटील, ‘एमएसआरडीसी’चे अधिकारी, ठेकेदार व धामणी गावांसह नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Farmers presenting their grievances in front of MLA Manikrao Kokate and Tehsildar Abhijit Baravkar in Tehsildar office.
Lumpy Disease: लम्पीचा प्रादुर्भाव वाढल्याने देवळा तालुक्यात चिंता! 15 दिवसांत 3 जनावरांचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.