येवला (जि. नाशिक) : अगोदर मागण्या पूर्ण करा, प्रलंबित अनुदान द्या व पुरेसा मोबदला द्या मगच ऑनलाइन पध्दतीने ( एनएमएमएस ) हजेरीची सक्ती करा अशी मागणी ग्रामरोजगार सेवक संघटनेने केली आहे. (Pay enough in advance then we will do attendence online Role of Gram Rojgar Sevaks Nashik News)
येथील गटविकास अधिकारी अन्सार शेख यांना दत्तात्रय चव्हाण, सुनील कदम, गीताराम आव्हाड, दीपक भडकवाड, श्रीराम कांगणे, प्रवीण पाटील, अशोक यादव, नरहरी मोरे, सुदाम कांबळे, रवींद्र उशीर आदींच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात पारदर्शकता आणावी यासाठी वैयक्तिक लाभाच्या योजना वगळता सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कामांवर काम करणाऱ्या मजुरांची हजेरी ऑनलाइन पध्दतीने (एनएमएमएस) घेण्याचा आदेश पारित केला आहे.
ही ऑनलाइन पध्दतीने हजेरी घेण्याच्या कामाच्या पध्दतीला ग्रामरोजगार संघटनेने विरोध दर्शविला आहे. ग्रामरोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्या सरकार पूर्ण करेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कामांवर काम करणाऱ्या मजुरांची हजेरी ऑनलाइन पध्दतीने घेणार नसल्याचे निवेदन येवला तालुका ग्रामरोजगार सेवक संघटनेकडून गटविकास अधिकारी अन्सार शेख यांना दिले आहे.
‘ २०११ च्या शासन निर्णयानुसार ग्रामरोजगार सेवक हा अर्धवेळ कर्मचारी समजला जातो. यातून स्वतःच्या कुटुंबातील उदरनिर्वाह होईल अशी आशा व्यक्त करू नये असे पत्रकात म्हटले असताना शासन रोजगार सेवकांना दिवसातून दोन वेळा ऑनलाइन हजेरी घेण्यास सांगत आहे.
अनेक रोजगार सेवकांना अँड्रॉइड मोबाईल नाही, महागडे रिचार्ज कशातून करायचे हा प्रश्न आहे. शासनाने अर्धवेळ कर्मचारी न समजता पूर्णवेळ कर्मचारी म्हणून असल्याची सुधारणा सन २०११ च्या शासन निर्णयात करावी.
रोजगार सेवकांना अँड्रॉइड मोबाईल, रिचार्ज, टी. ए, डी. ए , सादिल खर्च, वार्षिक प्रोत्साहनपर भत्ता प्रलंबित असलेल्या सर्व मागण्या पूर्ण करेपर्यंत ऑनलाइन हजेरी घेण्यात येऊ नये असे निवेदनात म्हटले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.