एकलहरे : नाशिक औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगारांचा वेतनवाढीचा फरक दोन वर्षे उलटून गेल्यावरही अद्याप देण्यात आलेला नाही. हा फरक तत्काळ मिळावा या संदर्भात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेने स्थानिक प्रशासनाला पत्र दिले आहे.औष्णिक वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांना जानेवारी २०२० पासून आजपर्यंत मंजूर झालेला किमान वेतनवरील फरक दोन ते तीन कंत्राटदार वगळता इतर कंत्राटदारांनी अद्यापपर्यंत दिलेला नाही. या महिन्याच्या २० तारखेनंतर, आता ३० तारखेनंतर दिला जाईल असे सध्या ‘तारीख पे तारीख’ सुरू असल्याने कामगारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
जगताहेत हलाखीचे जीवन
कंत्राटी कामगारांना वाढत्या महागाईत हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. प्रशासनाने वारंवार आदेश करूनही कंत्राटदार जैसे थे तशीच परिस्थिती लावून ठेवत आहेत, असा आरोप संघटनेचे अध्यक्ष भगवान पाटील यांनी केला आहे. त्याचबरोबर बरेच कंत्राटदार वेळेवर पगार करत नाहीत. त्यामुळे राशन भरण्यास व मागील उधारी चुकवली नाही, म्हणून पुढचे राशन दुकानदार देण्यास तयार होत नाही. कंत्राटी कामगारांवर अनेकदा उसनवारी करून, कर्ज घेऊन घरखर्च भागविण्याची वेळ आली आहे. यामुळे कंत्राटी कामगारांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
‘सकाळ’मुळे रोजंदारीत वाढ
किमान वेतनाचा प्रश्नाबाबत ‘सकाळ’ने वाचा फोडल्यावर कंत्राटी कामगारांच्या काहीअंशी दोनशे ते तीनशे रुपये रोजंदारीत वाढ झाली होती. आता वेतनवाढीचा फरक मिळावा, यासाठी ‘सकाळ’ने पुन्हा वाचा फोडावी, अशी मागणी कामगारांनी केली आहे.
वेतनवाढीच्या फरकाचे परिपत्रक येऊन दोन वर्षे उलटूनही वेतनवाढ फरक मिळालेला नाही. हा फरक कधी मिळणार, याकडे कामगार डोळे लावून बसला आहे.
-जितेंद्र पाटील, सचिव, महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.