Jal Jeevan Mission: जलजीवन मिशनच्या कामांची 13 दिवसांत द्यावी लागणार देयके

Jal Jeevan Mission: जलजीवन मिशनच्या कामांची 13 दिवसांत द्यावी लागणार देयके
esakal
Updated on

Jal Jeevan Mission : जलजीवन मिशनच्या कामांची देयके वेळेत देऊन पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी राज्याच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडील देयकांच्या फायलींचा प्रवास कमी केला आहे.

यासाठी जिल्हा परिषदेच्या लेखा व वित्त विभागात देयकांची फाइल न पाठविण्याचा निर्णय घेतला असून, देयक तयार करण्यापासून ते ठेकेदाराच्या बँक खात्यात देयक देण्याचा कालावधीही कमी करून तो १३ दिवसांवर आणला आहे. तसेच टेबलांची संख्याही २३ वरून १७ पर्यंत खाली आणली आहे. (Payment for Jal Jeevan Mission works to be made within 13 days nashik news)

जिल्हा परिषदांच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात १४१० कोटींची एक हजार २२२ कामे सुरू आहेत. ही कामे मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. ठेकेदारांनी कामे केल्यानंतर वेळेवर देयके मिळत नसल्याने पुढील काम करण्यावर मर्यादा येत असल्याच्या ठेकेदारांच्या तक्रारी आहेत.

तसेच देयकांच्या फायलींच्या प्रवासासोबत प्रत्येक जिल्हा परिषदेने वेगवेगळे धोरण ठरवले असल्याचे पाणी व स्वच्छता मंत्रालयाच्या लक्षात आल्यानंतर या विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांसाठी देयके वितरित करण्याच्या फायलींच्या प्रवासाबाबत एकच धोरण ठरविण्याचा निर्णय घेतला आहे.

Jal Jeevan Mission: जलजीवन मिशनच्या कामांची 13 दिवसांत द्यावी लागणार देयके
Nashik ZP News : जि. प. सेसमधून भजनी मंडळांना 1 कोटीचे साहित्य

त्यानुसार देयकांच्या फायलींचा प्रवास १३ दिवसांवर आणण्याबरोबरच यापुढे जलजीवनच्या देयकांच्या फायली जिल्हा परिषदेच्या लेखा व वित्त विभागाकडे न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ लेखाधिकारी यांनी तयार केलेल्या देयकांची तपासणी स्वच्छता व पाणीपुरवठा विभागातील लेखाधिकारी यांच्याकडून करून घेतली जाणार आहे. देयक तयार करून ते वितरित करण्याच्या कामामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी निर्णय घेतल्याचे पाणी व स्वच्छता विभागाने आदेशात म्हटले आहे.

प्रकल्प संचालकांकडे जाणार फाइल

देयकांची फाइल ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तपासणी करीत होते. पाणी व स्वच्छता विभागाने आता पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालकांकडे) देयकांची फाइल पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.

Jal Jeevan Mission: जलजीवन मिशनच्या कामांची 13 दिवसांत द्यावी लागणार देयके
Nashik News: आशा, गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ; मागण्यांवर तोडगा न निघाल्याने संप सुरूच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.