Nashik News: जिल्हा परिषद, पंचायत समिती कर्मचाऱ्यांचे वेतन जमा

ZP Nashik latest marathi news
ZP Nashik latest marathi newsesakal
Updated on

Nashik News : जिल्हा परिषद व जिल्ह्यातील १५ पंचायत समितीतील सामान्य प्रशासन व ग्रामसेवक संवर्गातील सर्व कर्मचारी व जिल्हा मुख्यालयातील विविध विभागांतील सर्व कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन १ ऑगस्टला बँक खात्यात वर्ग झाले आहे.

या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ११ कोटी २२ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. (Payroll of Zilla Parishad Panchayat Samiti employees Nashik News)

जिल्हा परिषदेतील कृषी, आरोग्य विभाग, शिक्षण प्राथमिक व माध्यमिक विभाग, पशुसंवर्धन व वित्त विभागातील सामान्य प्रशासन विभागांतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना १ तारखेला वेतन मिळाले. पालकमंत्री दादा भुसे यांनी मागील महिन्यात बैठक घेऊन १ तारखेला वेतन देण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्याआधारे सामान्य प्रशासन विभागाने कार्यवाही केली. ग्रामविकास विभागाच्या वतीने गुरुवारी (ता. २७) निधी प्राप्त झाला. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी सर्व गटविकास अधिकारी यांना चेंज स्टेटमेंट सादर करण्याच्या सूचना केल्या.

शनिवारी व रविवारी सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने रात्री दहापर्यंत सर्व देयकांचे एकत्रीकरण करण्यात आले. यामध्ये १ जुलैच्या वेतनवाढीचा देखील समावेश करण्यात आला.

वित्त विभागाच्या मान्यतेने जिल्हा कोशागारात ३१ जुलैला सायंकाळी साडेपाचला अनुदान वित्त विभागाच्या वतीने वर्ग करण्यात आले. कॅश मॅनेजमेंट सिस्टिमद्वारे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन जमा झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ZP Nashik latest marathi news
Phule University Result : निकालातील गोंधळ संपेना! अंतर्गत गुण चुकवले, पुणे विद्यापीठातील प्रकार

याकामी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ सहाय्यक ज्योती गांगुर्डे-बच्छाव, वरिष्ठ सहाय्यक योगेश कुमावत, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सोनाली भार्गवे, भूषण भार्गवे, सहाय्यक प्रशासन अधिकारी रवींद्र आंधळे, वित्त विभागातील वरिष्ठ सहाय्यक लेखा ज्ञानेश्वर बादड, विश्वजित कासारे, मंगेश जगताप,

कनिष्ठ लेखाधिकारी पूनम भांबरे, सहाय्यक लेखाधिकारी रमेश जोंधळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, जिल्हा कोशागार अधिकारी माधव थैल, तसेच सर्व पंचायत समिती आस्थापना लिपिक, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, सहाय्यक प्रशासन अधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी यांनी कामकाज केले.

ZP Nashik latest marathi news
Nashik News : पंधराव्या वित्त आयोगाचे 314 कोटी रुपये अखर्चित; पंचायत समिती व जिल्हा परिषदेला निधीची प्रतीक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.