Rain Crisis: पावसाअभावी घाटमाथ्यावरील पाझर तलाव कोरडेठाक! अपेक्षित पाऊस न पडल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ

pazar talao
pazar talaoesakal
Updated on

Rain Crisis : नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात घाटमाथ्यावर पावसाळा सुरु होऊन दोन महिने झाले तरी अद्याप तालुक्यातील जातेगाव आणि परिसरात दमदार पाऊस झाला नसल्याने पाझर तलाव कोरडेठाक पडले असून परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे.

तालुक्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. (Pazar lake on Ghatmathya dried up due to lack of rain farmer anxiety increased due to failure of expected rain nashik)

जून महिन्याच्या अखेरीस तालुक्यातील घाटमाथा परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडण्यास सुरवात झाली. जुलै महिन्यात चांगला पाऊस पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी बी-बियाणे आणि खते खरेदी करून शेतात मका, कपाशी, सोयाबीन, तूर, बाजरी, मुग इत्यादी नगदी पिके व धान्य कडधान्याची लागवड केली पिकांची लागवड केली.

मात्र जुलै महिना संपून देखील परिसरात दमदार पाऊस न झाल्याने आता विहिरींमधील पाण्याने तळ गाठला आहे तर पाझर तलाव पूर्णपणे कोरडेठाक पडले आहे.

पावसाच्या दररोजच्या रिमझिम सरी बरसत असल्याने शेतामध्ये पिकांची निंदणी, खुरपणी आणि मशागत करणे अशक्य झाले आहे. त्याचप्रमाणे पिकांची वाढ होण्यासाठी दमदार पाऊस आणि ऊन देखील महत्त्वाचे असते.

मागील दोन महिन्यांपासून ढगाळ वातावरण असून यात रात्री किंवा दिवसा एकदा- दोनदा पावसाच्या सरी बरसत असल्याने व ऊन पडत नसल्याने शेतात विविध प्रकारचे गवताची वाढ होत आहे.

ढगाळ वातावरणामुळे पिकांवर विविध प्रकारच्या कीटकांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. कीटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दररोजच्या रिमझिम पावसामुळे पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करून सुद्धा अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याने या भागातील शेतकरी मोठा अडचणीत सापडला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Revenue Week: शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास नवसंजीवनी; महसूल सप्ताहात प्रशासनाकडून मदतीचा हात

अनुदानाची प्रतिक्षा

एप्रिल व मे महिन्यात या परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती. त्यामुळे काढून ठेवलेला व काढणीस आलेल्या कांद्याचे, गहू व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना तीन महिने उलटूनही अद्याप शासकीय मदत मिळालेली नाही.

कांद्यास देखील ३५० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नसल्याने शेतकरी बांधवांनी आपल्या जवळ होते नव्हते ते चालू वर्षीच्या खरीप हंगामातील पिकांच्या लागवडीसाठी शेतात गुंतवणूक केल्याने शेतकरी पूर्णतः कोलमडला आहे.

पुढील काही दिवस जर अशीच परिस्थिती राहिली तर या भागात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

pazar talao
Nashik Water Crisis: वागदर्डी धरणाने गाठला तळ; मनमाड शहरावर पाणी टंचाईचे संकट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.