Nashik News: तपोवनातील पादचारी मार्ग खचला

A cobbled footpath in Tapovan
A cobbled footpath in Tapovanesakal
Updated on

Nashik News : औरंगाबाद रोडकडून तपोवनाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूला रुंद पथमार्ग तयार करण्यात आलेला आहे. मागील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामात हा रस्ता तयार करण्यात आला.

मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाकडे लक्ष देऊन हा रस्ता दोनदा खोदून तयार करण्यात आला. मात्र, पथमार्गाच्या बाबतीत ती दक्षता घेतली गेली नसल्याने या मार्गावर पथमार्ग खचला आहे. या पथमार्गावर रोज हजारोंच्या संख्येने नागरिक जॉगिंग करण्यासाठी येत असतात, त्यांना या खचलेल्या पथमार्गाची अडचण होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. (Pedestrian road in Tapovan damaged Nashik News)

तपोवनाच्या रस्त्याचे डांबरीकरण करताना दोन्ही बाजूला पाण्याचा निचरा होईल, याची व्यवस्था करण्यात आली. त्याची देखभाल आणि दुरुस्ती होत नसल्याने या रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडत आहेत.

या रस्त्याच्या पश्चिमेला असलेला पथमार्ग एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात खचला आहे. खचलेल्या भागात मोठा खड्डा पडला आहे. येथील पेव्हर ब्लॉक त्या खड्ड्यात गेले आहेत. या खड्ड्यामुळे येथून ये-जा करणे शक्य होत नाही.

तपोवन रस्त्यालगतच्या भागात नव्याने सिटीलिंक बस डेपो तयार करण्यात आलेला आहे. त्या डेपोकडे जाणाऱ्या रस्त्यापासून पुढे असलेल्या रस्त्यावरील पथमार्गात पथदीपांचे खांब, डीपीचे खांब आहेत.

सद्या डीपी नसल्यामुळे त्याचे केवळ खांबच उभे आहेत. या डीपीपासून थोडे पुढे हा खड्डा पडला आहे. खड्ड्यामुळे या भागातून ये-जा बंद झालेली आहे. तेथे बोरी आणि बाभळी यांचे काटेही झुडपे वाढली आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

A cobbled footpath in Tapovan
NMC News: ‘आपला दवाखाना’ अडकला लालफितीत; चुंचाळे शिवारात अवघा एक दवाखाना कार्यरत

तपोवनाच्या या रस्त्यावरील पथमार्गावर सकाळी व सायंकाळी मोठ्या संख्येने जॉगिंगसाठी येणाऱ्यांची गर्दी असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या पथमार्गाचा जॉगिंगसाठी वापर केला जातो. मात्र, खचलेल्या पथमार्गामुळे हा वापर बंद झालेला आहे.

त्यात काटेरी झुडपाची संख्या वाढल्याने त्यात आणखी भर पडली आहे. काही ठिकाणी बाभळीच्या झाडांच्या फांदी तोडण्यात आलेल्या आहेत. त्याचे काटे या पथमार्गवर पडून आहेत. याच पथ मार्गावर दोन ठिकाणी ग्रीनजिम बसविण्यात आली आहे.

त्यातील साधुग्रामच्या कमानीजवळील ग्रीनजिमचे साहित्य चोरीस गेलेले आहे. त्यात अजूनही पत्ता लागला नाही. पथमार्गात काही ठिकाणी जलवाहिनीच्या कामासाठी पेव्हर ब्लॉक काढण्यात आलेले होते. ते पुन्हा बसविण्यात आलेले नसल्याने अशा भागातून ये-जा करताना अडचण निर्माण होत आहे.

A cobbled footpath in Tapovan
NMC News: ‘आपला दवाखाना’ अडकला लालफितीत; चुंचाळे शिवारात अवघा एक दवाखाना कार्यरत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.