नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 410 Travelsवर दंडाचा बडगा; RTO-पोलिसांची संयुक्त कारवाई

RTO
RTOesakal
Updated on

नाशिक : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी व जादा प्रवाशांची वाहतूक केल्याप्रकरणी गेल्या आठवडाभरात ४१० खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व नाशिक शहर वाहतूक पोलिस यांच्या संयुक्त मोहिमेतून करण्यात आलेल्या या दंडात्मक कारवाईमध्ये ९ लाख १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

गेल्या ८ तारखेला नाशिक -औरंगाबाद रोडवरील ट्रक-खासगी ट्रॅव्हल्स अपघातामध्ये १२ प्रवाशांचा आगीत होरपळून तर, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती.नाशिक -औरंगाबाद रोडवरील मिर्ची हॉटेल चौफुली येथे झालेल्या भीषण अपघातानंतर आरटीओ, पोलिस खडबडून जागे झाले.(Penalties on 410 Travels for violating regulations RTO- Police Nashik News)

RTO
Eknath Khadse : माजी मंत्री खडसे यांच्या अडचणीत वाढ!

या चौफुलीवर अपघातांना आळा बसावा यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच, पोलिसांनी शहरातील खासगी ट्रॅव्हल्स असोसिएशनसमवेत बैठक घेत वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले होते. विशेषतः: जादा प्रवासी ट्रॅव्हल बसमध्ये आढळून आल्यास बस जप्त करण्याचीच तंबी पोलिस आयुक्तांनी दिली होती.

गेल्या १५ तारखेपासून शहरात दाखल होणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर नाकाबंदी करीत खासगी ट्रॅव्हलसची आरटीओ व पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे. गेल्या आठवडाभरात या संयुक्त पथकाने १०४१ खासगी ट्रॅव्हल्स बसेसची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४१० बसेसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ९ लाख १५ हजार ५५० रुपयांचा दंडही वसुल केल्याची माहिती शहर पोलिस वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त सीताराम गायकवाड यांनी दिली.

सहा ठिकाणी नाकाबंदी

शहर पोलिस व प्रादेशिक परिवहन विभागाने दिंडोरी रोड जकातनाका, पेठरोड जकातनाका, शिलापूर टोलनाका, शिंदे पळसे टोलनाका, नववा मैल-मुंबई आग्रा रोड व गौळाणे फाटा या सहा ठिकाणी नाकाबंदी करून खासगी ट्रॅव्हल्स बसेसची तपासणी सुरु केली आहे. प्रत्येक तपासणी नाक्यावर एक पोलिस अधिकारी, दोन पुरुष व एक महिला अंमलदार तसेच वाहतूक शाखेकडील दोन अंमलदार व प्रादेशिक परिवहन विभागाकडील एक अधिकारी असे पथक तैनात करण्यात आले आहे.

RTO
Diwali Festival : आमदारांना स्थानिक विकास निधीतून 80 लाखांच्या निधीचे Diwali Gift

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.