Nashik News : डिजिटल व्यवहारांकडे नागरिकांचा कल वाढला असून यामुळे एरवीही एटीएमवर दिसणारी गर्दी आता कमी होत चालली आहे. अगदी पाच रुपयांच्या कोथिंबिरीचे बिलेही फोन पे ने दिले जात आहे.
यामुळे सिन्नर तालुक्यात असलेल्या साठवर एटीएमपैकी ६० ते ७० टक्के वापर कमी झाल्याचे दिसून येत असून यामुळे बॅंकांचा खर्चही कमी होणार आहे. (people are not using atm but digital payment method for bill nashik news)
तंत्रज्ञानाच्या जगात मोबाईलपासून तर घरातील वस्तूंपर्यंत अनेक पर्याय आल्याने आज डिजिटल व्यवहाराकडे कल वाढत चालला आहे.
युगात पदार्पण करताना हळूहळू दिसत आहे. एटीएम हे साधन मागील वर्षांमध्ये पैसे काढण्यासाठी महत्त्वाचे साधन होते. दोन वर्षाच्या कोरोना संसर्गानंतर व्यवहारात बदल होत गेले.
भाजीपासून तर फळे, किराणा, दूध, कापड, पेट्रोल आदी लहान मोठ्या व्यवहारांमध्ये आता डिजिटल व्यवहारांना प्राधान्य दिले जात आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम एटीएमच्या वापरावर झाल्यामुळे आता शहरासह ग्रामीण भागातही एटीएम ओस पडण्याच्या मार्गावर आहेत.
पूर्वी जिथे एटीएममध्ये दररोज लोकांची गर्दी असायची तिथे आता शांतता दिसून येत आहे. शहरातच नव्हे तर तालुक्यातील नागरिकांसह कर्मचारी, व्यापारी यांचा ६० ते ७० टक्के एटीएमचा वापर कमी झाला आहे. आपत्कालीन स्थितीतच लोक आता एटीएममध्ये पोहोचत आहेत. पूर्वी नोटा भरणाऱ्या व्हॅन एटीएमला रोज दिसत होत्या, आता त्याही दिसत नाही.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
ऑनलाइन पेमेंटचा वापर
अनेकांनी भीम अॅप डाउनलोड केले. गुगल पे, पेटीएम आणि फोन पे इत्यादींचा सर्वाधिक वापर होत आहे. यामुळे ना पैसे बुडण्याची भीती आहे, ना खिशातून पैसे हरविण्याची. जे लोक एटीएममध्ये दर दोन तीन दिवसांनी जात होते ते आता अनेक महिनोंमहिने एटीएमपर्यंत पोहोचत नाहीत.
मोठे भरणे असल्यास तसेच ऑनलाइन चेक असला तरच बँकेमध्ये नागरिक दिसत आहे. पन्नास टक्के नागरिक हे ऑनलाइन पेमेंट करीत असल्याचे दिसत आहेत.
बॅंकाचा खर्चही कमी
डिजिटल पेमेंटमुळे बँकेच्या सोयी वाढल्या आहेत. बँकेत येणाऱ्या लोकांची गर्दी कमी झाली आहे. एटीएमची संख्याही कमी झाली आहे. सध्या अनेक एटीएम आउटसोर्सिंगद्वारे चालवले जात आहेत.
अनेकांचे एसी बंद पडले आहेत, अनेक ठिकाणी कचरा आहे. दुसरीकडे एका एटीएमवर बँकेला दरमहा ५०-६० हजार रुपये खर्च करावे लागतात. डिजिटल व्यवहारांमुळे बँकेचे हे खर्चही कमी होत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.