Nashik News : खड्डे चुकविताना नाशिककरांची ‘सर्कस’; वाहनांचेही नुकसान

Mechanic repairing a damaged vehicle due to potholes on the road.
Mechanic repairing a damaged vehicle due to potholes on the road. esakal
Updated on

Nashik News : शहरात पावसाचा जोर नसला तरी रिमझिम सरींनी शहरातील रस्त्यांची ‘वाट’ लागली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे चालकांना वाहन सांभाळायचे की खड्डा चुकवायचा, असा प्रश्‍न पडतो आहे.

यामुळे वाहनचालकांच्या जिवाशी खेळ सुरू असून, दुसरीकडे खड्ड्यांमुळे वाहनांचेही नुकसान होत आहे. यामुळे गॅरेज व्यावसायिकांचा व्यवसाय तेजीत आला आहे.

नाशिक शहरात पावसाने यंदा दीड महिना दडी मारली. त्यानंतर होणाऱ्या रिमझिम पावसाने शहरातील रस्त्यांची वाट लावली आहे. पावसाचा जोर वाढला तर रस्त्यांची स्थिती काय होईल, याचीच चिंता नाशिककरांना वाटते आहे. (people are stress due to increasing potholes on road nashik news)

गेल्या आठवडाभरापासून रिमझिम सुरू झाली आणि रस्त्यातील रस्त्यांवर जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य वाढले आहे.

त्यातच, अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवल्याने त्यावर केलेले डांबरीकरण जागोजागी खचल्याने नव्याने धोकादायक खड्डे तयार झालेले आहेत. परिणामी पावसामुळे हे खड्डे आणखीच जीवघेणे झाले असून, वाहनचालकांना वाहन चालविताना आपल्या जिवाशीच खेळावे लागत असल्याचा अनुभव घ्यावा लागतो आहे.

रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ

रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचते. त्यामुळे वाहन चालविताना चालकाला खड्ड्यांचा अंदाज येत नाही. विशेषतः दुचाकी त्या खड्ड्यात आदळली तर वाहनचालकाचा तोल जाऊन अपघाती घटना होत आहेत. तर या खड्ड्यांमध्ये वाहन आदळल्याने दुचाकीचालकांच्या कमरेला झटका बसतो.

त्यामुळे पाठीचा मणका दुखावण्याची शक्यता अधिक असते. तसेच मानेलाही इजा पोचून त्यातून मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता बळावते. गेल्या काही दिवसांपासून हाडांच्या तज्ज्ञांकडे पाठीचे मणका आणि मानदुखीच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Mechanic repairing a damaged vehicle due to potholes on the road.
CM Shinde News : ठाणे-नाशिक महामार्गासाठी CM शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये! रस्त्याच्या पाहणी करत दिल्या महत्वाच्या सूचना

गॅरेजवाले तेजीत

पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांमध्ये आदळून चारचाकी वा दुचाकी वाहनांमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. वेगात असलेले वाहन खड्ड्यात आदळल्यास वाहनाचे व्हील वा शॉक्बसरला दणका बसतो. दुचाकीचे व्हील यामुळे ‘आउट’ होण्याची शक्यता असते वा शॉक्बसर तुटण्याची शक्यता असते.

सध्या दुचाकी वाहन गॅरेज व्यावसायिकांकडे दुचाकी दुरुस्तीचे प्रमाण वाढले आहे. प्रामुख्याने पावसाचे पाणी गेल्याने दुचाकी बंद पडतात. तर, चारचाकी वाहनांना खड्ड्यांमुळे बिघाड होऊन तांत्रिक डॅमेजचे प्रकार वाढले आहेत.

"शहरातील खड्ड्यांमुळे दुचाकीचालकच नाही तर, चारचाकी चालकांनाही पाठीच्या मणक्यांचा त्रास होऊ लागला आहे. पावसाळ्यापूर्वी येणारे रुग्णही खड्ड्यांमुळे त्रास उद्‌भवल्याने येत, आता हे प्रमाण दुपटीपेक्षाही अधिक वाढलेले आहे. खड्ड्यांमुळे पाठीच्या मणक्याला इजा पोचून डिस्क सरकते. तर, वाहन खड्ड्यात आदळून बसलेल्या झटक्याने वा दणक्याने पाठीचा मणका, खांदा आणि मानेला गंभीर इजा पोहोचू शकते." - डॉ. मंगेश चव्हाण, अस्थिरोगतज्ज्ञ, नाशिक.

"पावसामुळे वाहने बंद पडण्याचे प्रकार वाढतात. परंतु पाऊस सुरू झाल्यापासून खड्ड्यांमध्ये वाहने आदळून शॉक्ब तुटणे, चाक आउट होणे, दुचाकी पडल्याने हॅण्डल बेंड होणे अशी वाहनेच दुरुस्तीसाठी येण्याचे प्रमाण वाढले आहे." - सतीश वाघ, गॅरेज व्यावसायिक

Mechanic repairing a damaged vehicle due to potholes on the road.
Nashik Music Industry : अभिजात संगीताचे दरवाजे पुन्हा उघडावे; संगीतक्षेत्रातील तज्ज्ञांची अपेक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.