Nashik News : कारवाईचा बडगा उगारताच कर भरणासाठी पिंपळगाव ग्रामपंचायतीत रांगा

Queues in village panchayats to pay taxes after action.
Queues in village panchayats to pay taxes after action.esakal
Updated on

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : गत महिन्याभरापासून पिंपळगाव ग्रामपंचायत प्रशासनाने कर थकबाकीदार नागरिक, व्यावसायिकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. गाळ्यांना सील करणे, नळ कनेक्शन तोडणे आदी पावले ग्रामपंचायतीकडून उचलली जात असल्याने धाबे दणाणलेल्या नागरिकांनी पिंपळगाव ग्रामपंचायतीत कर भरण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र आहे.

कर भरणा रोख किंवा ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्याची सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. यामुळे कर वसुलीचा टक्का वधारला आहे. (people crowd at Pimpalgaon Gram Panchayat to pay tax as action taken Nashik News)

जानेवारी महिन्यात अवघी ४० टक्के कर वसुली झाल्याने पिंपळगाव ग्रामपंचायतीसमोर थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान होते. अखेर सरपंच भास्करराव बनकर यांनी ॲक्शन मोडमध्ये येत कारवाईचे आदेश दिले.

त्यानुसार ग्रामविकास अधिकारी एल. जे. जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाईचा धडाका लावला होता. शंभरहून अधिक नळ कनेक्शन तोडले तर गाळ्यांना टाळे ठोकण्यात आले. यामुळे थकबाकीदार नागरिकांची मोठी पंचाईत झाली.

त्यांनी आर्थिक तजवीज करून कर भरण्यासाठी थेट ग्रामपंचायत कार्यालयाकडे धाव घेतली. गत दोन दिवसांपासून पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या कर वसुली विभागात थकबाकी भरण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागलेल्या दिसत आहे.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

Queues in village panchayats to pay taxes after action.
Unseasonal Rain : पावसाच्या शिडकाव्यामुळे बळीराजा हवालदिल; रब्बीतील पिकांवर संक्रांत

कधी नव्हे एवढी चढाओढ कर भरण्यासाठी सुरू झाली आहे. कारवाईच्या धाकाने इतर नागरिकही कर भरण्यासाठी येत आहे. कर भरल्यानंतर नळकनेक्शन जोडून कारवाई मागे घेतली जात आहे.

घरपट्टीची ७० टक्के वसुली

कारवाईनंतर कर संकलनाचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढला आहे. साडेतीन कोटी रुपये घरपट्टीची वसुली झाली असून ७० टक्क्यांवर पोचली आहे. तर पाणीपट्टी सव्वा कोटी रुपये वसुल होऊन ६० टक्क्यांपर्यंत संकलन झाले आहे.

Queues in village panchayats to pay taxes after action.
Employees Strike: सिन्नरला कार्यालयांमध्ये शुकशुकाट; विद्यार्थ्यांना अघोषित सुट्टी, पालकांची नाराजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.