Sakal Exclusive : सोशल मीडियावर अहिराणी गाण्यांची ‘क्रेज’; हिंदी आणि मराठी गाणीही ‘फेल’...

people liking Ahirani songs more than other on social media nashik news
people liking Ahirani songs more than other on social media nashik newsesakal
Updated on

Sakal Exclusive : कलाकाराने सकारात्मक राहणं आणि आपल्या कामात सातत्य ठेवत आपलं काम सातत्याने अवितरपणे सुरू ठेवलं तर आपल्या कामाची दखल निश्चितच घेतली जाते. हेच सध्या यूट्यूबवर‍ अहिराणी गाणी बनविणाऱ्या कलाकारांबद्दल घडतंय.

अहिराणी कलाकारांनी बनवलेल्या गाण्यांपुढे बॉलिवूडची हिंदी आणि मराठी गाणीही ‘फेल’ होताना दिसत आहेत. अहिराणी गाणी एकामागोमाग एक रेकॉर्ड मोडताना दिसत आहेत.

फक्त यूट्यूबच नाही, तर इन्स्टाग्राम, शेअरचॅट, फेसबुक अशा अनेक माध्यमांमध्ये अहिराणी गाण्यांवरचे रिल्स व्हायरल होत आहेत. या अहिराणी गाण्यांना अल्पावधीत कोट्यवधी व्ह्यूज मिळत आहेत. (people liking Ahirani songs more than other on social media nashik news)

अहिराणी कलाकारांनी बनविलेल्या गाण्यांपुढे बॉलिवूडची हिंदी आणि मराठी गाणीही सध्या फिकी पडत आहेत. अहिराणी गाणी प्रसिद्ध होण्यामागची अनेक कारणं आहेत. यातलं सर्वांत महत्त्वाचं अहिराणी गाण्यांची असणारी म्युझिक, गाण्यांच्या म्युझिकमध्ये असणारा रिदम म्हणजे गाण्याचा आत्मा.

या गाण्यांचे बोल एकदम रिअॅलिस्टिक वाटतात. कुठेही बडेजाव नाही. बॉलिवूडच्या गाण्यांमध्ये जसा कोरस डान्स असतो, तसा बनविण्याचा प्रयत्न आणि सिनेमॅटिक टच, एकदम झक्कास ! म्हणूनच ही गाणी व्हायरल होत आहेत.

सध्याच्या घडीला प्रसिद्ध अहिराणी गाणी

अहिराणीत प्रसिद्ध गाण्यांमध्ये ‘हाई झुमका वाली पोर’ या गाण्याने खूप भाव खाल्लाय. विनोद कुमावत आणि भय्या मोरे या दोन तरुणांनी गाणं लिहिलंय. खानदेशात वाढदिवसाचा कार्यक्रम असो, लग्न असो किंवा हळदीचा कार्यक्रम असो, कोणताही कार्यक्रम असो, हे गाणं नाही वाजलं तर त्या कार्यक्रमात मजाच नाही. विशेष म्हणजे फक्त अहिराणीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र या गाण्याचा चाहता आहे.

people liking Ahirani songs more than other on social media nashik news
Sakal Exclusive : शरीर, मनस्वास्थ्यासाठी अभ्यासासोबत मैदानी खेळ हवेच! तज्ज्ञांचे मत...

या गाण्याने यूट्यूबवर प्रदर्शित झाल्यापासून आतापर्यंतच्या अवघ्या एक महिन्यात तब्बल ३५ मिलियन व्ह्यूज मिळविले आहेत. तब्बल तीन कोटी ५० लाख प्रेक्षकांनी याला महिनाभरात पाहिले. विनोद कुमावत यांनी वर्षभरापूर्वी ‘कर मनं लगन’ हे गाणं तयार केलं होतं. या गाण्याने वर्षभरात तब्बल ५१ मिलियन व्ह्यूज मिळवलेत.

हे गाणं यूट्यूबवर इतर कलाकारांच्या चॅनल्सवरही प्रदर्शित करण्यात आलं आहे. त्यालाही मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळालेत. विशेष म्हणजे, या गाण्याचा प्रतिसाद पाहता या गाण्याचं फिमेल व्हर्जनही बनवण्यात आलं होतं.

त्याचबरोबर सचिन कुमावत यांचं ‘बबल्या इकस केसावर फुगे’ या गाण्याने यूट्यूबवर तब्बल २६६ मिलियन व्ह्यूज मिळविले आहेत. २६६ मिलियन म्हणजे २६ कोटी ६० लाख प्रेक्षकांनी हे गाणं आतापर्यंत यूट्यूबवर पाहिलंय. इतकं गाणं अनेकदा बॉलिवूडचं किंवा मराठीचंही गाणं प्रसिद्ध होऊ शकत नाही.

people liking Ahirani songs more than other on social media nashik news
Sakal Exclusive : वस्रोद्योग धोरणातून येवल्याची पैठणी गायब!; येवल्याची ओळख पुसली

सचिन यांचं ‘सावन ना महिना मा’ हे गाणं चार वर्षांपूर्वी प्रदर्शित केलं होतं. या गाण्याला तब्बल नऊ कोटी ७० लाख व्ह्यूज आहेत. तसेच, नुकतेच दोन महिन्यांपूर्वी केलेल्या ‘वाडी वाडी चंदनवाडी’ हे गाणंही प्रचंड लोकप्रिय झालंय. या गाण्याला आतापर्यंत एक कोटी १० लाख प्रेक्षकांनी पाहिलं आहे.

जगदीश संधानशिव या तरुणाचे ‘राजा तू मना राजा’ या गाण्याला आतापर्यंत ४९ मिलियन म्हणजेच जवळपास पाच कोटी प्रेक्षकांनी अवघ्या दहा महिन्यांत पाहिलं आहे. त्याचंच ‘तुना प्यार मा पागल वयना ये’ हे गाणं दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित केलं होतं. '

हे गाणं नव्या प्रकारे तयार करून जगदीश यांनी यूट्यूबवर शेअर केले आहे. याला साडेचार कोटी प्रेक्षकांनी पाहिलंय; तर यांच्याच ‘देख तुनी बायको कशी नाची रायनी’ या गाण्यालाही जवळपाच पावणेसहा कोटी प्रेक्षकांनी पाहिलं आहे.

people liking Ahirani songs more than other on social media nashik news
Shasan Aplya Dari : ‘शासन आपल्या दारी’मुळे वाहतुकीला बसणार फटका; असे आहे वाहतूक मार्गातील बदल..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.